अज्ञान-निष्काळजीपणामुळे विद्यार्थी सायबर गुन्हयात बळी!

12 Jul 2022 15:02:38
 
cyber cell
 
 
 
डोंबिवली: संगणक, मोबाईलचा उपयोग ऑनलाईन व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, त्याचा वापर करताना असणारे अज्ञान आणि होणाऱ्या निष्काळजीपणामुळे शाळकरी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी सायबर गुन्ह्यांचा बळी ठरत आहेत, असे मत मुंबई सायबर सेलचे पोलीस अधिक्षक संजय शिंत्रे यांनी व्यक्त केले. डोंबिवली प्रोग्रेसिव्ह ट्रस्ट संचालित ग्रीन इंग्लीश स्कूलतर्फे नुकतेच विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर लॉ आणि सिक्युरीटी अवेअरनेस’ या विषयावर सावित्रीबाई फुले नाटयगृहात एका सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिंत्रे बोलत होते.
 
 
मोबाईल आणि संगणकाचा वापर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकारही वाढले आहे. त्यात शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त असल्याचेही शिंत्रे यांनी सांगितले.
 
 
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना काय काळजी घ्यावी यासंदर्भात शिंत्रे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्यक्षात घडत असलेल्या घडामोडींची उदाहरणे देत त्यांनी विषयाचे गांभीर्य समजावून सांगितले.
 
 
यावेळी शाळेचे विश्वस्त अमर देशपांडे, डॉ. अरूण पाटील, विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे शिक्षक आणि विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
 
 
Powered By Sangraha 9.0