अमेरिका आणि द. कोरियाच्या हवाईदलाने २० लढाऊ विमानांद्वारे उ. कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनला नुकताच इशारा दिला. अमेरिका आणि द. कोरियाने युद्धाभ्यासाची छायाचित्रेही जाहीर केली. मात्र, याच गोष्टींमुळे खवळलेल्या किम जोंग उनने बॉम्बरने याचे प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले आहे.
अमेरिका आणि द. कोरियाच्या हवाईदलाने २० लढाऊ विमानांद्वारे उ. कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनला नुकताच इशारा दिला. अमेरिका आणि द. कोरियाने युद्धाभ्यासाची छायाचित्रेही जाहीर केली. मात्र, याच गोष्टींमुळे खवळलेल्या किम जोंग उनने बॉम्बरने याचे प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने यावर लगेचच इशारा देत म्हटले की, जर का उत्तर कोरियाने अणुबॉम्बची चाचणी केली,तर अमेरिका त्याचा सडेतोड उत्तर देण्यास सक्षम आहे. द. कोरियाने १६ ’एफ-३५ ए’, ‘एफ-१५ के’ आणि ‘एफ-१६’ या लढाऊ विमानांचा समावेश सराव अभ्यासात केला होता.
त्याशिवाय अमेरिकन हवाईदलातर्फे चार ‘एफ-१६’ विमानांनीही यात सहभाग नोंदविला होता. अमेरिकेचे लढाऊ सैन्य आणि विमाने सध्या दक्षिण कोरियाच्या कुनसान हवाई अड्ड्यावर तैनात आहे. यात बहुतांश विमाने ही सराव-अभ्यासाठी असल्याने घातक क्षेपणास्त्रांचा तितकासा समावेश केला नव्हता. मात्र, द. कोरियाने उ. कोरियाचा प्रत्येक हल्ला परतावून लावण्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले आहे. संरक्षण विश्लेषकांचे म्हणणे आहे की, अमेरिका आणि द. कोरियाच्या या अभ्यास दौर्यात लढाऊ विमाने युद्धाच्या वेळी क्षेपणास्त्रे आणि अणवस्त्रांच्या ठिकाणांसह, हुकूमशाह जोंगच्या कार्यालयांनाही नेस्तनाबूत करण्यासाठी सज्ज असतील. अणवस्त्रसज्ज असलेल्या उ. कोरियाने जमिनीखाली बंकर तयार केले आहेत.
दोन्ही देशांच्या पारंपरिक शत्रुत्वाचा विचार केला असता, या देशांचा जास्तीत जास्त खर्च हा संरक्षणसज्जतेसाठी होतो. याचा थेट फायदा हा चीन आणि अमेरिका या दोन्हीच देशांना होतो. उत्तर कोरिया सातत्याने क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करत असतो. त्यातच आता अणवस्त्रांची चाचणी करण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. अमेरिका आणि द. कोरियाने १० लढाऊ विमानांची एकाच वेळी चाचणी केल्यानंतर थेट संदेश देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यात दोन्ही देशांमध्ये वातावरण तापलेले आहे. किम जोंगने ५ जून रोजी आठ क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. अमेरिका आणि द. कोरियाच्या युद्धसरावादरम्यानच ही चाचणी पार पडली होती, हे विशेष.
अमेरिकेने दक्षिण चिनी समुद्र आणि कोरियन द्वीपांवरील तणाव लक्षात घेता, गुआम येथे नौसेनेच्या स्थळांवर चार ‘बी-१’ बॉम्ब तैनात केले आहेत. हे बॉम्बर ३ जूनला या ठिकाणी पोहोचले आहेत. ‘बी-१’ बॉम्बर अमेरिकी हवाईलदलाचे सर्वात मोठे बलस्थान मानले जाते. एका खंडापासून दुसरीकडे जाऊन लक्ष्य उद्ध्वस्त करण्याची ताकद या बॉम्बरमध्ये आहे. ‘बी-१’ बॉम्बरने वेग, हल्ल्याचा परीघ, उड्डाण या सर्व पातळीवर तब्बल ५० जागतिक विक्रम रचलेले आहेत. १४६ फूट लांबीच्या या बॉम्ब वर्षाव करणार्या लढाऊ विमानाची रुंदीच १३७ फूट इतकी आहे.
अमेरिकन बनावटीच्या ‘बी-१’ बॉम्बर ३५ हजार किलो वजन उचलण्याची ताकद या विमानात आहे. दोन पायलटसह एकूण चार क्रूचाही यात समावेश होतो. अमेरिकेने स्वतःची कितीही तटस्थ किंवा जगाची काळजी वाहणारा देश, अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला तरीही तो व्यर्थ आहे. कारण, जो प्रकार उत्तर रशिया-युक्रेनमध्ये झाला त्यात युद्धाची ज्वाळा भडकत राहावी, यासाठी जिथे जिथे दोन राष्ट्रांमध्ये वितुष्ट असेल तिथे अमेरिका एकतर मध्यस्थी करताना दिसेल अथवा मध्यस्थी करण्याच्या बहाण्याने संरक्षण करार, शस्त्रसज्जतेच्या नावाखाली नफा कसा कमावता येईल, हाच त्यांचा एकमेव हेतू राहिला आहे.
जगभरात असे युद्धबिंदू कसे तयार होत राहतील, याची चिंता अमेरिकेला सतावत राहते. यापूर्वी भारत-पाकिस्तानच्या युद्धात पाकिस्तानला मदत करणे असो वा आत्ता युक्रेन-रशिया युद्धात ‘नाटो’च्या माध्यमातून रशिया पोखरण्याचा प्रयत्न असो, महासत्ता असलेल्या या देशाचे स्वप्न सत्यात उतरत गेले. युद्ध सुरू राहिल्याने रशियासह संपूर्ण जगाला महागाईचा फटका बसला. सुरुवातीला रशियासमोर कसाबसा लढायला तयार होणारा युक्रेन आज रशियाच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत करूच शकला नसता.