आमचं हिंदुत्व शेंड्या जानव्याचं नाही म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी होमहवन

    07-Jun-2022
Total Views | 150
 
ut
 
 
 
 
संभाजी नगर : "आमचं हिंदुत्व शेंड्या जानव्याचं नाही". अश्या पद्धतीची विधान करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवर कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये म्हणून शिवसैनिकांकडून होमहवन करण्यात येत आहे. संभाजी नगरच्या दौलताबाद येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात ११ पुरोहित शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वतीने होम-हवन करत आहेत. हे हवन म्हणजे हनुमंताची आराधना करण्याची पूजा असून या आराधनेने आपल्यावर आलेलं संकट दूर होऊन यश कीर्ती प्राप्त होते. मनातील सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी विचित्रवीर हनुमान स्तोत्राचे पठण करत असल्याचे पुरोहितांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हनुमान चालिसा पठणाला विरोध करणारे शिवसैनिक, आज स्वतःच मुख्यमंत्र्यांची सभा निर्विघ्न पारपडावी म्हणून मारुतीरायाच्या चरणी होम-हवन करत आहेत.
 
 
 
८ जून १९८५ रोजी मराठवाड्यातील शिवसेनेची पहिली शाखा संभाजी नगर येथे स्थापन झाली होती. या शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनाचे औचित्यसाधून ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपने शिवसेना व महाविकास आघाडी विरुद्ध राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतलेला असताना, मनसेने हिंदुत्वाचे राजकारण सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर उद्या ८ जून रोजी संभाजी नगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मुख्यमंत्री जाहीर सभा घेणार आहेत. मनसेच्या सभे नंतर संभाजी नगर मध्ये मुखमंत्र्यांची सभा भुतो न भविष्यती अश्या स्वरूपाची होणार असा दावा शिवसैनिकांकडून केला गेला होता.
 
 
सभेची संपूर्ण तयारी जवळ जवळ पूर्ण झाली असून, वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणचे सभेच्या जाहिरातीचे बॅनर फाटलेले आहेत. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर भगव्या रंगाचा वापर करून एक भव्य मंच उभारण्यात आला आहे. सभेसाठी उशीर होऊ शकतो ही शक्यता लक्ष्यात घेऊन मोठ्या प्रमाणावर लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता राज्यसभा, विधान परिषद व राज्यातील विविध महानगर पालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या संरक्षण बजेटमध्ये झाली वाढ...

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या संरक्षण बजेटमध्ये झाली वाढ...

पाकिस्तानच्या कुरघोड्या, चीनची दहशतवादी देश असलेल्या पाकिस्तानला फूस, तुर्कीची पाकिस्तानशी वाढलेली जवळीक आणि भारताविरोधात या तिन्ही देशांची उघड झालेली आघाडी लक्षात घेतला केंद्र सरकारचे संरक्षण बजेट वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रामुख्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रासाठीचा एकूण निधी ७ लाख कोटींच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०२५-२६च्या अर्थसंकल्पात संरक्षण खात्यासाठी ६.८१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही तरतूद मागील वर्षीच्या बजेटच्य..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121