मुंबई : दि.२५ जून हा जागतिक त्वचारोग दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. डॉ. दीप्ती देसाई, ‘कम्युनिटी डर्मेटोलॉजी फॉर महाराष्ट्र’ आणि राष्ट्रीय स्तरावरील चेअरपर्सन म्हणतात की,”योग्य शैक्षणिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही उपक्रमांची रचना केली आहे. त्यांच्या रुग्णांसाठी खास पोस्टर्स, ‘पीपीटीएस’, रुग्णालये, दवाखाने, शाळा, महाविद्यालये इत्यादी ठिकाणी त्वचारोगाबद्दल जागृती करतात.
त्वचेच्या समस्येबद्दल योग्य ज्ञान देतात. ” याच विषयाच्या जनजागृती हेतूने असोसिएशनने नुक्कड नाटकही बसवले आहे, जे 15 वेगवेगळ्या भाषांमध्ये नियोजित आहे. संस्थेचे उपक्रम स्थानिक वृत्तपत्रे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पोहोचणार आहेत, ज्यामुळे संपूर्ण देशभर त्वचारोगासंदर्भात जागरूकता निर्माण होणार आहे. संस्थेचा केंद्रीय संदेश आहे की, सगळेच त्वचारोग हे संसर्गजन्य किंवा जीवघेणा नाही. त्यामुळे निराश होऊ नका आणि पात्र त्वचारोगतज्ज्ञांशी संपर्क साधून उपलब्ध विविध उपचारांचा लाभ घ्या. त्वचाविकारासंदर्भात जनतेमध्ये जागृती मिळावी, तसेच यासंदर्भात रूग्णांना सुलभ उपचार मिळावेत, यांसाठी ‘आयएडीव्हीएल’चे अध्यक्ष सुनील वर्तक सातत्याने प्रयत्नशील आहेत.