सोलापूर : उसाचे बिल मागणाऱ्या शेतकऱ्याला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली आहे. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आढावा बैठकीत हा राडा झाला आहे. जगन भोसले असे त्या मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. साखर कारखान्याच्या सत्ताधारी भालके गटाने आयोजित केलेल्या विचार विनिमय बैठकीत, राष्ट्रवादीच्या नेत्यासमोरच हा राडा झाला असल्याची माहिती मिळत आहे.
सहकारी साखर कारखाने आणि वादंग हे जुने समीकरण आहे, साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकरी, सहकारी चळवळीवर राजकीय नियंत्रण मिळवायचे हा राजकीय पक्षांचा जुना खेळ आहे. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी तर हे आयतच कुरण आहे. साखर कारखान्यांमधून येणार फायदा आणि त्यावर गब्बर झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकारणी हे दुष्टचक्र कायमच चालू राहिले आहे. अशा मारहाणीच्या प्रसंगांतुन गरीब शेतकरी कसा नाडला जातो हेच स्पष्ट होते आणि हीच महाराष्ट्राची दुरावस्था आहे.