मुंबईत 'या' भागात फुलले दुर्मिळ 'क्रायनम लिली'

17 Jun 2022 13:39:19
Flower
 
 
मुंबई(प्रतिनिधी): मुंबईच्या गोरेगाव येथील 'बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी'च्या संवर्धन शिक्षण केंद्रात 'क्रायनम लॅटिफोलियम' ही वनस्पती फुलली आहे. या वनस्पतीला मराठीत सुदर्शन असे नाव आहे. ही वनस्पती वर्षातून एकदाच फुलते. पावसाळ्याच्या सुरवातीच्या दिवसात ही वनस्पती फुलून येते.
 

Flower1 
 
'क्रायनम लॅटिफोलियम' ही वनस्पती पश्चिम घाटातील जंगलात वाढते. पहिल्या पावसानंतर सह्याद्रीचे काही डोंगर उतार या वनस्पतीने झाकलेले दिसतात. या फुलांना एक विलक्षण मधुर सुगंध असतो. या फुलांचे देठ वनस्पतीच्या पानांच्या १८-२४ इंच वर असतात. तसेच एका वेळेला पाच फुले फुलतात बहुतेक फुले वसंत ऋतु आणि शरद ऋतूमध्ये येतात. ही वनस्पती जमिनीखालील कंद तयार करते. या कंदातून तयार होणाऱ्या बियापासून ही वनस्पती प्रजनन करते. ही एक औषधी वनस्पती आहे.  आणि आयुर्वेदात या वनस्पतीचे अनेक उपयोग सांगितले आहेत. पावसाळ्याच्या सुरवातीला ही फुले फुलतात. आणि वर्षातून केवळ एकदाच, एका आठवड्यासाठी या फुलांना पाहता येते. सध्या 'बीएनएचएस'च्या गोरेगाव येथील केंद्रात ही फुले पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0