भाजपचा शिवसेनेला दे धक्का; महिला शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश

15 Jun 2022 12:49:49

shivsena pravesh
 
 
 
 
ठाणे : ठाणे शहर भाजपने मंगळवारी शिवसेनेला पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपशहर संघटक संध्या सुरेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या कार्याला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून पसंती मिळत असल्यामुळे प्रवेशाची मालिका सुरूच असल्याचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी सांगितले.
 
 
 
भाजपच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात महिला शिवसैनिकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आ. निरंजन डावखरे, आ. संजय केळकर, माजी गटनेते मनोहर डुंबरे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक सुनेश जोशी, सरचिटणीस विलास साठे, कैलास म्हात्रे आदींची उपस्थिती होती.
 
 
 
या वेळी काही पदांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. भाजपच्या महिला मोर्चाच्या शहर उपाध्यक्षपदी संध्या साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली, तर माजी नगरसेवक सुधीर बर्गे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, शशिकांत नगीन साळवी व निलेश गोवर्धन भगत यांची चिटणीसपदी, गजेंद्र तोमर यांची कार्यकारिणी सदस्यपदी आणि ‘आयटी सेल’च्या संयोजकपदी प्रणय गावकर यांची नियुक्ती करण्यात आली.
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0