यूकेमध्ये मंकीपॉक्सचा वेगाने होतोय प्रसार, स्थिती चिंताजनक : डब्ल्यूएचओ

14 Jun 2022 14:33:10
 
 
 
monkeypox
 
 
 
 
नवी दिल्ली: युनाइटेड किंग्डममध्ये सोमवारी मंकीपॉक्स वायरसचे १०४ नवीन प्रकरणे नोंदवली गेली. आफ्रिकेपलीकडे हा रोगाचा सर्वात मोठा उद्रेक आहे. संपूर्ण देशामध्ये आता मंकीपॉक्सच्या रुग्णांची एकूणसंख्या ४७० वर पोहोचली आहे. बहुतेक प्रकरणे समलिंगी आणि उभयलिंगी पुरुषांमध्ये आढळून आली आहेत. एकूण प्रकारणांपैकी युकेमधल्या ९९ टक्के पुरुषांमध्ये हा आजार आढळला आहे. बहुतेक संक्रमित लोक लंडनमध्ये आहेत. लैंगिक प्रवृत्ती असूनही लोकांनी संक्रमित व्यक्तीशी शारीरिक संपर्क टाळावा असा आव्हाल आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.
 
 
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की उद्रेक झालेल्या अनेक लोकांमध्ये रोगाची वैशिष्ट्ये नीट दिसून येत नसल्यामुळे, डॉक्टरांना निदान करणे अधिक कठीण होऊ शकते. या रोगाचा प्रसार युके मध्ये वेगाने होत असल्याचं सुद्धा डबलयूएचओने म्हटलं आहे. व्यक्तीच्या संपर्कात आल्यास, मंकीपॉक्सचा प्रसार होऊ शकतो. यू.एन.च्या आरोग्य संस्थेने असेही म्हटले आहे की, "वीर्य आणि योनीमार्गातील द्रवांसह लैंगिक शारीरिक द्रव या संक्रमणामध्ये काय भूमिका बजावतात हे अजून स्पष्ट झालेलं नाही." आफ्रिकेतील काही देशांमध्ये, १,५०० हून अधिक मंकीपॉक्सची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
 
Powered By Sangraha 9.0