कॉमेडियन’ कुणाल कामरा पुन्हा वादात! इस्लामवाद्यांचा कामरावर पलटवार

13 Jun 2022 10:43:36
 
 
 
kunal kamra 1
 
 
 
 
नवी दिल्ली: उत्तर प्रदेश पोलिसांच्या दंगलखोर जमावावर केलेल्या कारवाईवर त्यांनी शेअर केलेल्या मीमने सोशल मीडियावरील इस्लामवाद्यांनी ट्विटरवर कथित ‘कॉमेडियन’ कुणाल कामरा याच्यावर टीका केली. झोया अख्तरच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाची प्रतिमा त्याने ट्विट केली असून चित्रपटाच्या नायकांच्या मागे लाठीचार्ज करत असलेल्या लेझर डोळ्यांसह एका संतप्त दिसणाऱ्या पोलिसाची प्रतिमा आहे. मूळ चित्रपटात फरहान अख्तर, हृतिक रोशन आणि अभय देओल प्रमुख भूमिकेत होते.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
या मीममध्ये इस्लामवाद्यांना फारसा विनोद आढळला नाही आणि त्यांनी कामरावर टीका करण्यास सुरुवात केली. इस्लामवाद्यांना रागावलेलं पाहून, कुणाल कामरा याने घाबरून, तो मीम लगेचचं सोशल मीडियावरून काढून टाकला. कामरासारख्या ‘कॉमेडियन’ने अनेकदा हिंदूंच्या मृतदेहांची विटंबना केली आहे. अलीकडेच, त्याचा सहकारी मुन्नवर फारुकी याने एका व्हिडिओमध्ये २००२ च्या गोध्रा हत्याकांडातील पीडितांची खिल्ली उडवली होती. ज्यावेळी लोकांनी त्यावर आक्षेप घेतला तेव्हा आक्षेप घेणार्‍यांवर ‘असहिष्णु’ आणि ‘धर्मांध’ असल्याचा आरोप करण्यात आला होता.
 
Powered By Sangraha 9.0