तौक्ते ते असनी : काय आहे वादळांच्या नावामागचं गूढ?

09 May 2022 17:38:40
cyc
 
 
 
 
मुंबई: आंध्र प्रदेश आणि ओडिशाकडे सरकणारे तीव्र चक्रीवादळ 'असनी' पुढील दोन दिवसांत हळूहळू कमकुवत होण्याची अपेक्षा आहे. हे या मोसमातील पहिले चक्री वादळ असून त्याला श्रीलंकेने नाव दिले आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात जेव्हा 'तौक्ते' भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकले तेव्हा लोक या नावाचे मूळ शोधताना दिसले.  म्यानमारने नाव दिलेल्या या चक्रीवादळाच्या नावाचा अर्थ बर्मी भाषेत “गेको” म्हणजे पाल असा होतो. त्याचप्रमाणे, बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात विकसित झालेल्या असनी चक्रीवादळाला श्रीलंकेने नाव दिले. असनी म्हणजे 'सिंहली'मध्ये “क्रोध”.
 
 
 
भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड यांचा समावेश असलेल्या 'जागतिक हवामान संघटना' तथा 'युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड द पॅसिफिक' या गटाने प्रदेशात चक्रीवादळांचे नाव देण्याचा संयुक्त निर्णय २००० साली  घेतला. प्रत्येक चक्रीवादळाच्या नामकरण प्रक्रियेमागे एक प्रक्रिया असते. जगभरात सहा प्रादेशिक विशेष हवामान केंद्रे आहेत आणि पाच प्रादेशिक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ चेतावणी केंद्रे आहेत, ज्यांना सल्ला देणे आणि चक्रीवादळांचे नाव देणे बंधनकारक आहे. सन २०२० मध्ये १६९ नावांसह चक्रीवादळांच्या नावांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या मध्ये १३ देशांतील प्रत्येकी १३ नावांचा समावेश होता. आसनीनंतर निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचे नाव सित्रांग असेल आणि हे नाव थायलंडने दिले आहे.
 
 
 
भारतातील आगामी नावे 'घुरनी', 'प्रोबाहो', 'झार' आणि 'मुरासू' ही असणार आहेत. तसेच इतर चक्रीवादळांच्या नावांमध्ये बिपरजॉय (बांगलादेश), आसिफ (सौदी अरेबिया), डिक्सम (येमेन) आणि तुफान (इराण) आणि शक्ती (श्रीलंका) यांचा समावेश आहे. भारतातील नावांमध्ये गती, मेघ आणि आकाश यांचा देखील समावेश आहे.
 
 
संख्या आणि तांत्रिक संज्ञांच्या विरूद्ध चक्रीवादळांना नावे दिल्याने ही नावे लोकांना लक्षात ठेवणे सोपे होते. ही प्रक्रिया सामान्य लोकांव्यतिरिक्त, वैज्ञानिक समुदाय, मीडिया, आणि आपत्ती व्यवस्थापकांना देखील मदत करते. एका नावाने ओळखल्या जाणाऱ्या चक्रीवादळा जागरूकता निर्माण करणे सोप्पे जाते
Powered By Sangraha 9.0