ताजमहालात नमाज ? जाणून घ्या पुरातत्व खात्याचे उत्तर

30 May 2022 12:32:12
 
tajmahal
 
 
 
 
 
नवी दिल्ली: जगभरातील सात आश्चर्यांपैकी एक मानल्या गेलेल्या ताजमहालमध्ये नमाज पपठणाबद्दल भारतीय पुरातत्व खात्याने नुकताच एक खुलासा केला आहे. पुरातत्व खात्याने दिलेल्या माहितीनंतर ताजमहालासंबंधीच्या वादंगांना निराळेच वळण लागण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध इतिहासकार राजकिशोर राजे यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर पुरातत्व खात्याने हा खुलासा केला आहे. ताजमहालमध्ये नमाज पठणाबद्दल त्यांनी हा प्रश्न विचारला होता त्यावर ताजमहालमध्ये नमाज पठणाबद्दल कुठलेही ऐतिहासिक संदर्भ आढळत नाहीत असे उत्तर पुरातत्व खात्याने दिले आहे.
 
 
 
 
४ पर्यटकांना झाली अटक
 
 
काही दिवसांपूर्वी तेलंगणातून आलेल्या ४ पर्यटकांना ताजमहालात नमाज पठणाबद्दल अटक करण्यात आली होती. हे पर्यटक ताजमहाल बघायला आलेले असताना त्यांनी तेथील शाही मशिदीत नमाज पठण केले होते. याचवेळी त्यांना तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी अटक केली होती. यानंतर यावरून वाद उठले होते. पुरातत्व खात्याच्या म्हणण्यानुसार शाहजहान बादशहाच्या काळापासून ताजमहालात नमाज पठणाचे संदर्भ आढळत नाहीत. त्या काळात ताजमहलात सामान्य नागरिकांना जाण्याची परवानगीच नव्हती तर नमाज तर दूरचीच गोष्ट असा खुलासा पुरातत्व खात्याने आपल्या उत्तरात केला आहे.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0