मान्सून केरळमध्ये दाखल!

29 May 2022 21:03:03
Rain12
 
 
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये आगमन झाले.हे आगमन नेहेमीची तारखेपेक्षा तीन दिवस आधी झाल्याचे सांगण्यात आले आहे. रविवार दि.२९ रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
 
 
 
गुरुवार दि. २६ पर्यंत केरळच्या केवळ ३३ टक्के भागांमध्ये पाऊस पडत होता. मात्र, आज दि २९ रोजी हे क्षेत्र 50 टक्क्यापर्यंत वाढले आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. अरबी समुद्र आणि केरळवर ढग पूर्ण पसरलेले आहेत. केरळमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. त्याच बरोबर पश्चिमेकडील वाऱ्याचा जोर वाढला आहे. या सर्व बाबींची पुष्टी करून आयएमडीकडून मान्सूनच्या आगमनाबाबत घोषणा करण्यात आली आहे.
 
 
 
 
यावर्षी दि . १६ मे रोजी नैऋत्य मान्सूनचे अंदमान समुद्रात लवकर आगमन झाले होते. परंतु त्यानंतर मान्सूनची प्रगती मंदावली होती. आयएमडीने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, येत्या दोन-तीन दिवसांत केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, अरबी समुद्र आणि लक्षद्वीपच्या आणखी काही भागात मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे. केरळ आणि माहेमध्ये ४ जूनपर्यंत बऱ्यापैकी पाऊस पडण्याची शक्यता आहे.भारतात मान्सूनचे आगमन लवकर झाले असल्यामुळे तांदूळ आणि तेलबिया यांसारख्या पिकांच्या उत्पादनाला चालना मिळेल अशी आशा आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0