पाकिस्तानच्या काश्मीरमधल्या सायबर युद्धाला प्रत्युत्तर

28 May 2022 20:13:22
 
kashmir
 
 
भविष्यात दहशतवादी संघटना आणि त्यांचे पाकिस्तानस्थित ‘हँडलर सायबर ऑपरेशन्स`चा वापर अजून तीव्र करण्याची शक्यता आहे. चार पारंपरिक युद्धांव्यतिरिक्त, पाकिस्तानने गेल्या तीन दशकांमध्ये काश्मीरमधील ‘प्रॉक्सी`बंडखोरीला समर्थन दिले आहे. आता ते अत्याधुनिक झाले आहे. त्यानिमित्ताने भारत-पाक सायबर युद्धाचे स्वरुप आणि त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...


 
इंटरनेट आणि मोबाईल फोनच्या जलद प्रसारामुळे पाकिस्तानच्या ‘इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स`ला काश्मीरमधील माहिती- तंत्रज्ञानाच्या ताकदीची जाणीव झाली. ‘सायबर` हल्ल्यांसाठी पाकिस्तान फ्रंट गटांसह कार्य करण्यास प्राधान्य देतात. ‘नेटस्काउट, एक युएस`-आधारित ‘टेक` कंपनी, तीन पाकिस्तानी कंपनींला प्रगत पर्सिस्टंट धोका (advanced persistent threat) गट म्हणून ओळखते, जे कंपनीनुसार पाकिस्तान-समर्थित हॅकर्स होते. पाकिस्तानी ग्रुपला ‘ट्रान्सफरंट ट्राईब` म्हटले जाते. ईमेल, मेसेज आणि फाईल्स उघडण्यासाठी ‘क्लासिफाईड` माहिती चोरण्यासाठी टार्गेट्सला प्रलोभन देण्यासाठी फिशिंगचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
 
 
काश्मीरमध्ये इंटरनेट युगाची सुरुवात


२०१० पर्यंत काश्मीरमधील सामान्य नागरिकांमध्ये सोशल मीडिया वेगाने लोकप्रिय झाले. परिणामी, संताप आणि राग बाहेर काढण्यासाठी अनेकांना फेसबुक, युट्यूब आणि ट्विटर हे नवीन चॅनेल बनले. सोशल मीडियाच्या माध्यमातून मध्य पूर्वेतील घटना काश्मीरपर्यंत पोहोचल्या आणि काश्मीरमधील अतिरेकीपणा उग्र इस्लामी बनत चालला होता. या सगळ्यात इंटरनेट क्रांतीने महत्त्वाची भूमिका बजावली. ‘सायबर` डोमेनची क्षमता लक्षात आल्यानंतर, पाकिस्तानने आपल्या काश्मीर ऑपरेशन्समध्ये ‘सायबर` डोमेनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली.
 
 
 
एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन ॲप्सच दहशतवादी गटांकडून वापर


व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि सिग्नल यांसारख्या ‘एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन ॲप्लिकेशन्स`चे आगमन ही एक क्रांती होती, ज्याने दहशतवादी गटांना मदत केली आणि सुरक्षा दलांसमोर मोठे आव्हान उभे केले. ‘पाकिस्तान गुप्तहेर संस्था`, काश्मीरमधील दहशतवादी गट, ‘एन्क्रिप्टेड ॲप्लिकेशन्स`चा मोठ्या प्रमाणात विघटन मोहिमा आणि हेरगिरीच्या वापरासाठी ‘सायबर` डोमेनचा वापर करते. भारताला इस्रायलकडून ‘पेगासस` मिळाल्यानंतर मानवी गुप्तहेर माहिती शिवाय दहशतवादविरोधी ऑपरेशन्समध्ये तांत्रिक गुप्तहेर माहितीचा (TECHNICaL INTELLIGENCE) सैन्याने मोठ्या प्रमाणावर वापर केला, अशा तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भारतीय सैन्याचे चकमकींमधील यशाचे प्रमाण वाढले आणि २०१६ पासून भारतीय सैन्याला जबरदस्त यश मिळाले. म्हणून काही दहशतवादी गट टेलिग्राम आणि सिग्नलसारख्या अधिक सुरक्षित ॲपकडे वळले. त्यानंतर दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांनी डिझाईन केलेल्या अजून प्रगत ॲप्सवर स्विच केले. अनेक ॲप, कॅल्क्युलेटर, स्काइपची गुगल प्ले स्टोरवर उपस्थित नाही, ज्यामुळे ते आणखी गुप्त बनतात. म्हणून दहशतवादी अशा ॲप्सकडे वळले.
 
 
 
तुर्की एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन ॲप डाऊनलोड


परदेशी दहशतवादी काश्मीरमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांचे हँडलर, शस्त्रे वितरक आणि ओव्हर ग्राउंड वर्कर्स समन्वयकांशी संपर्क साधतात. दहशतवाद्यांचा पाकिस्तान-आधारित हँडलर्सशी सर्व संवाद अशा ॲप्सद्वारे होतो. या ॲप्लिकेशन्समध्ये मजबूत सुरक्षा आणि एन्क्रिप्शन वैशिष्ट्ये आहेत. जर सर्व्हरमध्ये प्रवेश असेल, तरच चॅट्स प्राप्त केल्या जाऊ शकतात. दहशतवादी संघटनांचा दूरच्या देशात सर्व्हर असल्यास, या चॅट्स डीकोड करणे अशक्य होते. अलीकडे, काश्मिरींनी तुर्की एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन ॲप ‘बिप` डाऊनलोड केले आहे. तुर्कस्तान काश्मीरवर पाकिस्तानला नेहमीच पाठिंबा देतो. अनेक काश्मिरी फुटीरतावाद्यांना तुर्कस्तानमध्ये आश्रय आणि नोकऱ्या मिळाल्या आहेत. काश्मीरच्या फुटीरतावादी आणि जिहादी गटांशी तुर्कस्तानचे संबंध लक्षात घेता, गरज असेल तेव्हा अशा चॅट्स मिळवणे भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी खूप आव्हानात्मक असू शकते.
 
 
 
‘डार्क वेब`चा वापर


‘कलम .३७०` रद्द केल्यानंतर इंटरनेटवर काही काळ बंदी घालण्यात आली. दहशतवादी गटांनी ‘व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क` वापरून बंदी वर मात केली. कालांतराने, इतर अनेक नवकल्पनांचा नियमित वापर करण्यात आला, जसे की, ‘दि ओनियन राउटर` आधारित ॲप्स. काही परदेशी दहशतवादी ‘सॅटस्लीव्ह` हे उपकरण वापरतात, जे एखाद्याच्या फोनला सॅटेलाइटशी लिंक करू शकतात, नियमित फोनला सॅटेलाईट फोनमध्ये बदलू शकतात. याशिवाय, दहशतवादी गट अधिकाधिक ‘डार्क वेब`चा वापर करत आहेत, ज्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे कठीण होत आहे.
 
 
 
विध्वंस, तोडफोड आणि हेरगिरी


‘सायबर` ऑपरेशन्समध्ये तोडफोड, हेरगिरी आणि विध्वंस यांचा पण (Subversion, Sabotage, and Espionage) समावेश होतो. पाकिस्तानी ‘सायबर` जिहादी सोशल मीडिया हँडलची फौज चालवतात, ज्याचा वापर भारताविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठी केला जातो. घरात लपलेल्या अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान, सैन्यावर दगडफेक करून सुरक्षा ऑपरेशनमध्ये व्यत्यय आणण्यासाठी चकमकीच्या ठिकाणी लोकांना भडकवण्यासाठी आणि एकत्रित करण्यासाठी संदेश आणि व्हिडिओ ‘व्हायरल` होतात. विकासाला अनुकूल असलेल्या आवाजांवर हल्ला करण्यासाठी ‘ट्रोल आर्मी`चा वापर केला जातो. त्यांच्यावर देशद्रोही असल्याचा आणि भारतीय गुप्तचर संस्थांसोबत काम केल्याचा आरोप असतो. पाकिस्तान ‘सायबर` जिहादी ‘प्रॉक्सी` ऑनलाईन ‘ब्लॉग` आणि संकेतस्थळ चालवतात जे नियमितपणे फुटीरतावादी आणि अतिरेकी साहित्य प्रकाशित करतात. काश्मीर फाईट ‘ब्लॉग` भारत समर्थक आवाजांच्या हत्या घडवून आणण्यासाठी कुप्रसिद्ध झाले होते.



या ‘ब्लॉग`ने नागरी हक्क कार्यकर्ते, थिंक टँक, शैक्षणिक आणि दहशतवादाला विरोध करणाऱ्या पत्रकारांमध्ये दहशत पसरवली होती. प्रसिद्ध पत्रकार शुजात बुखारी यांचे नाव ‘ब्लॉग`वर आल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. याशिवाय, ‘सायबर ऑपरेशन्स` निवडकपणे उत्तेजक चित्रे पोस्ट करून, त्यांना रीट्विट करून आणि ‘हॅशटॅग` चालवून भारताविरुद्धच्या जागतिक कथनाला (running hashtags) मदत देतात.


इस्लामाबादच्या ‘सायबर` दहशतवाद्यांनी काश्मिरी जिहादचे चित्रण करण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे, ज्याला हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण म्हणून काश्मीरला भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय वाद म्हणून पाहिले जाते. दहशतवादी गट भारताच्या इतर भागांमध्ये जातीय हिंसाचार आणि ध्रुवीकरणाच्या कृत्यांचा प्रभावीपणे वापर करून जातीय आणि धार्मिक द्वेषावर स्थानिक काश्मिरींना कट्टरतावादी बनवतात.
 
 
 
‘सायबर` हल्ल्यांवर किंवा ‘हॅकिंग` हल्ल्यावर लक्ष



‘सायबर` अटॅक अनेक प्रकारचे असतात. पासवर्ड क्रॅकिंग, सोशल इंजिनिअरिंग, सोशल मीडिया, सेवेला नकार, मध्यस्थ, मालवेअर, रॅन्समवेअर अथवा अन्य व्हायरसचा वापर, फिशिंग ईमेल्स, डाटा किंवा आयडेंटिटीची चोरी. याची व्यापकता याहून खूप मोठी आहे.भारताची ‘नॅशनल टेक्नोलॉजी रिसर्च ऑर्गनायझेशन` ही तंत्रज्ञानाच्या मदतीने गुप्तहेर माहिती काढणारी महत्त्वाची संस्था आहे. तिच्या अंतर्गत भारताच्या दोन संस्था ‘नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर (National Critical Information Infrastructure Protection Centre) आणि ‘सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम,` (सीईआरटी) ‘सायबर` हल्ल्यांवर किंवा हॅकिंग हल्ल्यावर लक्ष ठेवून असतात.



‘नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर` ही संस्था देशातील राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या संस्थांच्या ‘सायबर नेटवर्क`चे रक्षण करते. वेळोवेळी या संस्थांचे सुरक्षा ‘ऑडिट` करते आणि संस्थांमध्ये असलेल्या त्रुटी या त्यांना सांगितल्या जातात. मात्र, ज्या वेळेला ‘सायबर` हल्ला करण्यामध्ये यश मिळवतात, त्यावेळेला ‘कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम` ही लगेच कारवाई करते आणि जशी सैन्याची ‘क्विक रिॲक्शन टीम` दहशतवादी हल्ल्याला लगेच प्रत्युत्तर देते, तसेच काम ही टीम करते. या संस्थेला भारताच्या ‘क्रिटिकल इन्फॉर्मेशन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर`चे रक्षण करण्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळाले आहे.
 
 
 
स्वतःचे सर्दैव रक्षण करणे मोठे आव्हान


देशाची सर्व प्रकारची माहिती आज संगणकांमध्येच एकत्रित केलेली असते. ‘सायबर` क्षेत्रांमध्ये रोज काहीतरी नवनवीन संशोधन केले जाते, म्हणूनच आपल्याला जसे ॲण्टिव्हायरस`वर रोजच संशोधन करून आपल्या संगणकाची सुरक्षा करावी लागते, तशीच कामगिरी या संस्था करत असतात. पाकिस्तान भारतावरती हल्ले करण्याकरिता रोजच नवनवीन प्रकारांचा वापर करतो आणि आपण आपले रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, कुठल्याही रक्षा पद्धतीला स्वतःचे सर्दैव रक्षण करणे हे फार मोठे आव्हान असते. म्हणूनच, आपण काश्मीरमध्ये जसा ‘सर्जिकल स्ट्राईक` केला होता, अशाच प्रकारचा ‘सर्जिकल स्ट्राईक` ‘सायबर` लढाईमध्ये पाकिस्तानवर वेळोवेळी करण्याची गरज आहे.



 त्यांना हे दाखवून देणे महत्त्वाचे आहे की, जर तुम्ही आमच्यावर हल्ला करून आमच्या ‘क्रिटिकल इन्फॉर्मेशन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर`ला धोका निर्माण केला, तर त्यापेक्षासुद्धा मोठा धोका आम्ही तुमच्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर`ला निर्माण करून तुमचेसुद्धा नुकसान करू शकतो, म्हणून असा हल्ला करायची हिंमत करू नका. आक्रमक ‘सर्जिकल सायबर स्ट्राईक` पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याकरिता वेळोवेळी वापरले गेले पाहिजे.
 
 
(नि.) ब्रि. हेमंत महाजन




 
Powered By Sangraha 9.0