हिंदूंविरोधात मुस्लिम संघटनांचे षडयंत्र

27 May 2022 14:00:24

muslim
 
 
 
नवी दिल्ली: वाराणसी येथील ज्ञानवापी ढाचा, मथुरा येथील शाही ईदगाह यांसारख्या हिंदू मंदिरे पडून उभारलेल्या मशिदीच्या विरोधात हिंदू संघटनानांनी न्यायालयीन मार्गाने आवाज उठवला आहे. मात्र हिंदू संघटनांच्या या सनदशीर लढ्याच्या विरोधात मुस्लिम संघटनांनी आगपाखड सुरू केली आहे. कट्टर मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने हिंदू संघटनांच्या या लढ्याच्या विरोधात मुस्लिमांना एकत्र येणायचे आवाहन केले आहे. २३-२४ मे रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत हे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
या बैठकीत एक सविस्तर निवेदनच जाहीर करण्यात आले आहे. या निवेदनातील चार महत्वाचे मुद्दे असे की
 
 
- ज्ञानवापी ढाच्याच्या आवारातील वजूखान्यात प्रवेशबंदी लावण्यात आली आहे ती हटवावी
 
 
- हिंदू संघटना १९९१च्या वर्शीप कायद्याच्या विरोधात आहे ते लगेच थांबवण्यात यावे.
 
 
- भाजपशासित राज्यांमध्ये मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे.
 
 
- मंगळुरु येथील जमा मशिदीवरून उठलेला वाद हा हिंदू मुस्लिम संघर्षाचे कारण ठरेल
 
 
असे इशारे या निवेदनातुन देण्यात आले आहेत. मुस्लिम कट्ट्टरतावादी संघटना असलेली पीएफआय ही संघटना कायम वादग्रस्त राहिली आहे. दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये लोकांना भडकावणे, हिंसक कारवायांना पैसे पुरवणे, CAA आणि NRC या कायद्यांविरोधात झालेल्या आंदोलनामध्ये सहभाग असणे यांसारखी घातपाती कामे या संघटनेच्या नावावर आहेत. ही संघटना कुख्यात दहशतवादी संघटना सिमीची आघाडीची संघटना मानली जाते. हिंदू संघटनांच्या कायदेशीर लढाईला मुस्लिम संघटनांकडून पद्धतशीरपणे बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु झाले आहे हेच यातून दिसते.
 
 
 
मुंबई : "अनिल परब यांची रवानगी नाटक कंपनीत झाली पाहिजे" असा घणाघाती आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या त्यांनी केला आहे. अनिल परब यांच्यावर गुरुवारी ईडीच्या धाडी पडल्या. दापोली तालुक्यातील मुरुड येथील जमीन व्यवहारासंबंधात अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई सुरु झाली आहे. यावर अनिल परब ईडीच्या कारवाईशी काही संबंध नाही असे परब सांगत आहेत ते त्यांचे नाटक आहे.
अनिल परब यांनी कोरोना काळात टाळेबंदीचे सर्व नियम धुडकावून लावत जमीन विकत घेतली जिची बाजारभावात किंमत २५ कोटी रुपये इतकी आहे. हीच जमीन अनिल परब यांनी १ कोटी रुपयांना विकत घेतली
Powered By Sangraha 9.0