Monsoon Update: मुंबईत लवकरच मान्सूनपूर्व पाऊस

20 May 2022 17:02:56
Rain
 
 
 
मुंबई(विशेष प्रतिनिधी): मुंबई शहरात आज दि. २० मे पासून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. केरळ आणि कर्नाटकात पाऊस पाडणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत पुढील तीन दिवसात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे
 
मुंबई मान्सूनपूर्व सरींचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या हालचाली दि. २१ मे पासून हलक्या स्वरुपात सुरू होतील असा अंदाज आहे, त्यानंतर, दि. २४ मे पासून, पाऊस थोडा अधिक तीव्र होऊ शकतो. नैऋत्य मान्सून अंदमान पर्यंत पोहोचला आहे. यामुळे मोसमी वारे वाहण्याचा मार्ग आता बदलला आहे. यामुळे मुंबईत दिवसभर पश्चिमेचे वारे वाहू लागले आहेत. या पूर्वी, सकाळच्या वेळी पूर्वेकडून आणि ईशान्येकडून वारे वाहत होते. आणि दुपारी एकच्या सुमारास समुद्राची वारे वाहत आहेत असे स्कायमेटने सांगितले. सुरुवातीचे दोन दिवस फक्त ढग दिसतील. पुढे तीन ते चार दिवसांनंतर मुंबईत पाऊस बऱ्यापैकी हजेरी लावेल असा अदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0