नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियातील क्रेगीबर्न गुरुद्वारात खलिस्तान समर्थनाचे पोस्टर लागले असल्याची घटना समोर आली आहे. खलिस्तानी दहशतवादी भिंद्रनवाले याचेही पोस्टर्स या गुरुद्वारात लावले गेले होते. या गुरुद्वारात निहंग शिखांचा वेष धारण केलेला एक शीख लोकांना धमकावत असल्याची माहिती एका शीख महिलेने दिली आहे. या गुरुद्वारात येणाऱ्या भाविकांना हे शस्त्रधारी शीख धमकावत होते, काही लोकांनी पोलिसांना बोलवले होते पण या खलिस्तानवादी लोकांनी आत येण्यास प्रतिबंध केला. या सर्व लोकांनी गुरुद्वारात चालू असेलेला खलिस्तानवादी कार्यक्रम थांबवू दिला नाही.
ऑस्ट्रलयामध्ये घडलेली ही पहिली घटना नसून बऱ्याच गुरुद्वारांमध्ये खलिस्तान समर्थनाचे कार्यक्रम होत आहेत. २६ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या नवी दिल्ली इथे झालेल्या हिंसाचाराचेही समर्थन केले जात आहे. या सर्व घटनांमुळे हिंदू आणि शीख यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे.