पंतप्रधानांचे जर्मनी मध्ये भव्य स्वागत

02 May 2022 13:55:00
 
modi
 
 
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या युरोपच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात जर्मनी देशात पंतप्रधानांचे भव्य असे स्वागत झाले. पंतप्रधान मोदी जर्मनीची राजधानी बर्लिन येथील त्यांच्या हॉटेल मध्ये पोचताच मोदींचे जयघोषत स्वागत करण्यात आले. या वेळी मोदींनी लहान मुलांशीही बातचीत केली. एका मुलीने मोदींना तिने मोदींचे काढलेले चित्र या प्रसंगी भेट दिले.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २ मे ते ४ मे या तीन दिवसीय युरोप दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या तीन देशांचा दौरा करणार आहेत. फ्रान्सचे  पुन्हा निवडून आलेले अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रोन यांचीही मोदी भेट घेणार आहेत.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0