मुंबई(प्रतिनिधी): एका महिला वन परिक्षेत्र अधिकार्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी उपवनसंरक्षक यांच्यावर दि. २८ एप्रिल रोजी आरोप करण्यात आले होते. मात्र, त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही, अशा आशयाचे पत्र या महिला अधिकार्याने राज्याच्या मुख्यमंत्री तथा वनमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले आहे.
उपवनसंरक्षकाविरुद्ध शुक्रवारी दि ६ मे रोजी एमआयडीसी सांगली पोलिस ठाण्यात सीआरपीसी कलम ३५४ आणि ३५४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजी महाराजांच्या काळात राज्याच्या पाटलाने अत्याचार केले तेव्हा त्याचे हाथ कलम करण्यात आले होते. मात्र, आपल्या शिवराज्यात आरोपी सर्व गोष्टी 'माॅनेज' करत आहेत. आता एफआयआर देऊन पंधरा दिवस उलटून गेले आहेत. तरीही अद्याप कारवाई केली जात नाही आहे. लवकरात लवकर यावर कारवाई करण्यात यावी. शेवटची आशा म्हणून हे पत्र लिहित आहे. असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.