मुंबई(प्रतिनिधी): मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सात तलावांमध्ये सरासरीच्या २२.९९ टक्के इतका पाणी साठा उपलब्ध आहे. सध्या मुंबई शहराला ८२ दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. एकूण १४,४७,३६३ लाख दशलक्ष लिटर क्षमतेच्या तुलनेत ३,२१,८९१ दशलक्ष लिटर इतका साठा आहे.
मुंबईत पावसाळा व्हायला अजून वेळ आहे. बीएमसी दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी तलावांमधील पाण्याच्या पातळीचा आढावा घेते. भातसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तानसा आणि मोडक सागर येथून शहराला पाणी येते. तुळशी आणि विहार ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेले दोन तलाव आहेत. सात तलावांमधून मुंबईला दररोज सुमारे ३,८५0 दशलक्ष लिटर पाणी मिळते. गत वर्षी दि. १५ मे रोजी पाणीसाठा १८.२६ टक्के होता. पावसाळ्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या अखेरीस सात तलाव १०० टक्के भरले, तर शहरात वर्षभरात पाणीकपात होण्याची शक्यता नाही. ऑगस्ट २०२० मध्ये, पावसाच्या कमतरतेमुळे तलावांच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे मुंबईला पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस अशी आशा आहे.