पूर्वद्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

17 May 2022 16:19:01
eeh
 
 
मुंबई (प्रतिनिधी): सोमवार दि. १६ तारखेपासून सकाळच्या वेळी पूर्वद्रुतगती मार्गावर विक्रोळी ते घाटकोपरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहिला मिळाल्या. 'जेवीएलआर (जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड) उड्डाणपूल १३ ते २४ मे या कालावधी साठी बंद ठेवण्यात आला आहे.
 
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आणि पूर्वद्रुतगती मार्गावर मुंबईच्या पूर्व उपनगरात प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना सोमवारपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)कडून सुरू असलेले दुरुस्तीचे काम २४ मे पर्यंत चालणार आहे. त्यानंतर उड्डाणपूल पुन्हा वाहनधारकांसाठी खुला होणे अपेक्षित आहे. या मार्गाची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. मुंबई वाहूतक पोलीस येथे उपस्थित आहेत. आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
"जेवीएलआर पुलाची दुरुस्ती सुरू आहे, ही वाहतूक कोंडी याचा परिणाम आहे. हा पूल २४ मे रोजी पुन्हा खुला होणार आहे. आम्ही रहदारी सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत." असे मुंबई पोलिसांनी सांगितले
Powered By Sangraha 9.0