पुण्यातील गावात बिबट्याचा वावर

16 May 2022 18:41:25
leopard
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): पुणे जिल्ह्यातील खेडमधील जौलाके खुर्द गावात एक प्रौढ बिबट्या परिसरात फिरताना आढळून आला. महाराष्ट्र वनविभाग आणि 'वाईल्डलाईफ एसओएस'च्या दहा तासांच्या प्रदीर्घ मोहिमेनंतर शुक्रवारी दि. १३ रोजी रात्री बिबट्याची सुटका करण्यात आली.
 
 
 
जौलाके खुर्द गावातील रहिवाशांनी महाराष्ट्र वनविभागाला कळविण्यात आले. शुक्रवारी दि. १३ रोजी 'वाईल्डलाईफ एसओएस' आणि महाराष्ट्र वनविभागाने ही संयुक्त कारवाई केली. कॅमेरा ट्रॅप्स आणि पायांच्या ठश्यांच्या आधारे वनविभागाने बिबट्याच्या ठिकाणाची खात्री केली. तरीही, सुरुवातीला बिबट्याला वाचवण्याचे प्रयत्न विस्कळीत झाले. कारण घाबरलेल्या बिबट्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. आणि अधिकाऱ्यांना वेगळा मार्ग स्वीकारण्यास भाग पाडले. अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर बिबट्या पिंजऱ्यात यशस्वीपणे दाखल झाला आणि त्याला वैद्यकीय निरीक्षणासाठी माणिकडोह बिबट्या बचाव केंद्रात हलवण्यात आले.
  
 
 
"जौलाके खुर्द गावाने यापूर्वी मानव-बिबट्याचा संघर्ष इतका अनुभवलानव्हता. मात्र, या भागात बिबट्यांचा वावर हळूहळू वाढत आहे. या बिबट्याला वाचवताना आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे तो दिवसा पटकन दिसत नाही आणि रात्री अत्यंत सक्रिय असतो." असे खेड रेंजचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप रौंदळ म्हणाले. "बिबट्यांचा मागोवा घेणे हे अत्यंत कठीण काम आहे आणि त्यासाठी काही महिनेही लागू शकतात! वनविभाग आणि वन्यजीव एसओएस टीमला सुमारे एक दिवसाच्या विक्रमी वेळेत बिबट्याचा माग काढता आला." असे 'वाईल्डलाईफ एसओएस'चे वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बांगर म्हणाले.
Powered By Sangraha 9.0