फ्लेमिंगोंवर आता उप्रग्रहाद्वारे लक्ष

13 May 2022 18:17:00
fl
 
मुंबई(प्रतिनिधी): मुंबईत प्रथमच 'ग्रेटर' आणि 'लेसर' फ्लेमिंगोंचे जीपीएस टॅगगिंग करण्यात आले आहे. बीएनएचएसच्या शास्त्रज्ञांनी भरतीच्या ठिकाणी जाऊन सहा फ्लेमिंगोना रेडिओ टॅग केले आहे. सध्या, हे सर्व फ्लेमिंगो बेलापूर जवळच्या 'ट्रेनिंग शिप चाणक्य' आणि लगतच्या पाणथळ प्रदेशात फिरत आहेत.
 
 
 
बीएनएचएसने 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्रकल्पाचा भाग म्हणून ठाणे खाडीतील 'लेसर' आणि 'ग्रेटर' फ्लेमिंगोचे स्थलांतर आणि अधिवास समजून घेण्यासाठी 'उपग्रह टेलिमेट्री अभ्यास' सुरू केला. याद्वारे शास्त्रज्ञांनी या वर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत भरतीच्या ठिकाणी सहा फ्लेमिंगो पकडले. त्यानंतर फ्लेमिंगोंवर सौर उर्जेवर चालणारे 'जीपीएस-जीएसएम' रेडिओ टॅग लावण्यात आले आहेत. सध्या, सर्व फ्लेमिंगो 'ट्रेनिंग शिप चाणक्य' आणि लगतच्या पाणथळ प्रदेशात फिरत आहेत. या सहा फ्लेमिंगोना 'खेंगरजी' , 'लेस्टर' 'मॅककॅन' 'सलीम' 'हुमायून' 'नवी मुंबई' अशी नवे देण्यात आली आहेत. यांनतर त्यांच्या संवर्धनासाठी व्यवस्थापन कृती सुचवण्यात येणार आहे.
 
 
 
इराण आणि कझाकिस्तानमध्ये टॅग केलेले सुमारे 25 ग्रेटर फ्लेमिंगो भारतात सापडले होते. विशेष म्हणजे कच्छमध्ये फ्लेमिंगोच्या प्रजननाबाबत अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. म्हणूनच, फ्लेमिंगोच्या स्थलांतराचे रहस्य उलगडण्यासाठी संपूर्ण भारतातील प्रजनन आणि प्रजनन-एतर जागेंवर पद्धतशीर आणि ठोस 'रिंगिंग' आणि 'सॅटेलाइट टेलिमेट्री' अभ्यासाची आवश्यकता होती.
“बीएनएचएसने गेल्या ९५ वर्षांत सात लाखांहून अधिक पक्षी रिंग केले आहेत. आणि त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी १५ पक्ष्यांच्या प्रजातींवर १७५ उपग्रह ट्रान्समीटर तैनात केले आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये, शास्त्रज्ञांनी ट्रेनिंग शिप चाणक्य आणि आसपासच्या १८,००० हून अधिक पक्ष्यांवर रिंग तैनात केल्या आहेत. पक्ष्यांचे स्थलांतर आणि 'सेंट्रल एशियन फ्लायवे' (CAF) मधील त्यांची स्थिती समजून घेण्यासाठी या अभ्यासाद्वारे तयार केलेली माहिती महत्त्वपूर्ण आहे." असे बीएनएचएसचे संचालक डॉ. बिवाश पांडव म्हणाले.

fl1 
फ्लेमिंगो विषयी
जगात फ्लेमिंगोच्या सहा प्रजाती अस्तित्वात आहेत, त्यापैकी दोन - 'लेसर फ्लेमिंगो' ' फोनिकोनायस मायनर' आणि 'ग्रेटर फ्लेमिंगो' 'फोनिकॉप्टरस रोझस' - भारतात आढळतात. जगात २२ ते ३२ लाख लेसर फ्लेमिंगो असल्याचा अंदाज आहे. तर ग्रेटर फ्लेमिंगोंची संख्या पाच ते आठ लाख आहे. 'आययुसीएन' द्वारा करण्यात आलेला वर्गीकरणानुसार लेसर फ्लेमिंगो धिक्याच्या धोक्याच्या स्थितीत नाहीत. तर, ग्रेटर फ्लेमिंगोना तूर्तास धोका नाही. लेसर फ्लेमिंगोच्या वितरणाचा विस्तार मोठा आहे. आणि ते उत्तर-पश्चिम भारत आणि भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर आढळतात, तर, ग्रेटर फ्लेमिंगो पूर्व आणि ईशान्य भारत वगळता संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात आढळतात.
 
स्थलांतराचा इतिहास
सप्टेंबर ते मे या कालावधीत सुमारे १.३ लाख फ्लेमिंगो ठाणे खाडीला भेट देतात. ठाणे खाडी परिसर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आणि औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. भारतीय उपखंडातील फ्लेमिंगोचे प्रजनन आणि स्थलांतर हे विसाव्या शतकापासून एक रहस्य आहे. कच्छच्या रणात 'ग्रेटर फ्लेमिंगो'चे प्रजनन १९९० मध्ये महाराव श्री 'खेंगरजी तिसरे' यांनी पहिले होते. त्यांनी 'कॅप्टन सी.डी. लेस्टर' यांना कळवले. कच्छच्या रणातही लेसर फ्लेमिंगोचे प्रजनन होते या कथेला १९७४ मध्ये पुष्टी डॉ. सलीम अली यांनी दिली. तेव्हापासून, कच्छमध्ये देखील फ्लेमिंगोच्या प्रजननावर अभ्यास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0