
मुंबई : जगभरातील ख्रिस्ती धर्मियांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांना सध्या पायाच्या दुखण्यामुळे व्हीलचेअर वरून फिरावे लागत आहे आणि दुसरीकडे भारतात त्यांचे अनुयायी बाजिंदर सिंग हे आपल्या चमत्कारांनी रुग्णांना एका झटक्यात व्हीलचेअरपासून मुक्तता मिळवून दिल्याचा दावा करत असल्याचे उघड झाले आहे. आपलय अनेक कार्यक्रमांमधून ते अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्योग करतात आणि आत हेच पाद्री बाजिंदर सिंग आता मुंबईत हा आपला चमत्कारांचा कार्यक्रम करणार आहेत. १२ मे रोजी मुंबईतील बीकेसी येथे हा कार्यक्रम होणार आहे.
आपल्या कार्यक्रमांत बाजिंदर सिंग हे पायाच्या असाध्य व्याधी असलेल्या रुग्णाला बोलावतात, त्यांना भूतबाधा झाली असल्याचे सांगून मंत्र म्हणून त्या रुग्णाला जखडुन राहिलेल्या वाईट शक्तींना हाकल्यासारखे करतात आणि मग तो आता पर्यंत हलूही न शकणारा रुग्ण एकदम धावयालाच लागतो. अशा पद्धतीने या कार्यक्रमात गोष्टी घडतात. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे जिथे अंधश्रद्धा विरोधी कायदा संमत झाला आहे. सध्या महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या तीन पक्षांपैकी दोन पक्ष धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करतात पण आता या सरकारच्याच नाकाखाली हा कार्यक्रम होतो आहे आता या कार्यक्रमावर कशी कारवाई होणार हे बघणे महत्वाचे ठरेल.
याच बाजिंदर सिंग याच्याविरूद्ध राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाचे मुख्य सचिव धर्मेश भंडारी यांनी ट्विटर वर एका व्हिडिओद्वारे या बाजिंदर सिंग याने कश्या पद्धतीने आपल्याकडे येणाऱ्या महिलांवर जबरदस्ती केली आहे, त्यांना कशा पद्धतीने तो धर्मांतर करण्यास भाग पाडत आहे हे दाखवले आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. पुढे असेही म्हटले आहे की या बाजिंदर सिंगच्या चंदीगढ येथील चर्च ऑफ विस्डम च्या नावाने असे अनेक व्हिडिओज समोर आले आहेत की ज्यामध्ये बाजिंदर सिंग अंधश्रद्धा पसरवणारी कृत्ये करत आहे. याच बरोबर मुंबईतील एका मृत मुलीला जिवंत करण्याच्या नावाखाली ८० हजार रुपये उकळल्याचाही आरोप आहे. याशिवाय अनेक आरोप या बाजिंदर सिंग वर दाखल करण्यात आले आहेत.