रशिया- युक्रेन युद्धाच्या सावटातही भारतीय अर्थव्यवस्था मजबूच

05 Apr 2022 14:43:31

fikki  
 
 
 
 
 
नवी दिल्ली: जगातील सर्व अर्थव्यवस्था या रशिया - युक्रेन युद्धाच्या झळांनी पोळून निघत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र या वातावरणातही मजबूत राहणार असल्याचे फिक्कीच्या अहवालातून समोर आले आहे. नुकताच फिक्कीचा २०२२-२३ साठीचा अहवाल प्रकाशित झाला आहे, अहवालात नमूद केलेल्या अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग ७.४ टक्के राहणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर वाढवले जाणार असल्याचा अंदाजसुद्धा वर्तवला आहे.
 
 
 
भारतीय अर्थव्यवस्थेला असलेला कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही, तसेच रशिया- युक्रेन युद्धही लांबलेले आहे या सर्वांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणारच आहे. युद्ध परिस्थितीमुळे वाढलेले इंधनाचे दर, महागाई ही अर्थव्यवस्थेसमोरची सध्याची सर्वात मोठी आव्हाने आहेत. मार्च २०२२ मध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यातून भारतीय अर्थव्यवस्थेचे आशादायी चित्र समोर येत आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0