जेवण दिले नाही म्हणून हमीदने कुटूंबाला टाकले जाळून!

05 Apr 2022 18:55:02

mrdr
 
 
 
थिरुवअनंतपुरम: केरळच्या इडुक्की जिल्ह्यात चेनिक्कुझीमध्ये ७९ वर्षीय अलियाकुन्नेल हमीद मकर याने स्वतःच्या दोन नातवंडांसह मुलगा आणि सुनेला घरात बंद करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घराला कुलूप लावत आग लावली. कोठडीतील हमीदने पोलिसांना 'सगळे संपले का?', असं म्हणत "मला दुपारच्या जेवणासाठी मटण आणि मासे मागितली. चेनिक्कुझी गावातील धक्कादायक प्रकारामुळे तणाव निर्माण झाला होता. शनिवार, दि. १९ मार्च रोजी १२.३० रात्री वाजता हा प्रकार घडला.
हमीदचा धाकटा मुलगा मोहम्मद फैजल उर्फ शिबू (४५), त्याची पत्नी शीबा (४०) आणि त्यांच्या मुली मेहरीन (१६) आणि आसना (१३) अशी मृतांची नावे आहेत. मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. हमीदने आपल्या मुलाच्या बेडरूमला बाहेरून कडी लावली. मुख्य दरवाजाला बाहेरून कुलूप लावले. फैजल आणि त्याचे कुटुंबीय ज्या खोलीत झोपले होते. खोलीत खिडकीतून पेट्रोल ओतून त्यांना पेटवले.
 
रात्री संपूर्ण कुटूंब झोपेत असताना फैजलने पलंगावर पेट्रोल टाकले. आरोपीचा मुलगा दाराकडे धावत आला तेव्हा त्याला बाहेरून कुलूप लावल्याचे दिसले तेव्हा हमीद खिडक्यांमधून पाहत होता. ते जळत असतानाही हमीद खोलीत आणखी पेट्रोल टाकत राहिला.
फैजलच्या धाकट्या मुलीने शेजारी राहुल राजनला त्याच्या मोबाईलवर फोन केला आणि मदतीसाठी आरडाओरडा केला. राहुलने घटनास्थळी धाव घेत समोरचा दरवाजा आणि बेडरूमचा दरवाजा तोडला. हमीदने राजनला धक्काबुक्की केली आणि बेडरूममध्ये आणखी पेट्रोल टाकले.
 
 
या गोंधळादरम्यान हमीद पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण शेजाऱ्यांनी सावधगिरी बाळगून काही तासांनंतर त्याला ताब्यात घेतले. पोलीसांच्या ताब्यात दिल्यावर त्याला गुन्ह्याच्या ठिकाणी आणण्यात आले. घडल्या प्रकाराबद्दल कुठलाही पश्चाताप हमीदला नाही. घरच्यांनी जेवण दिले नाही म्हणून मी त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची कबुली त्यांनी दिली. पोलीसांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे
Powered By Sangraha 9.0