मुंबई(प्रतिनिधी): मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गवरील ‘वाईल्डलाईफ ओव्हरपास’चे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) याबाबत माहिती दिली आहे.
नागपूरजवळील सुरुवातीच्या ठिकाणापासून 15 किमी अंतरावर हा अपघात झाला. मुंबई आणि नागपूर दरम्यानच्या 700 किमी लांबीच्या द्रुतगती मार्गावर एकूण आठ वन्यजीव ‘ओव्हरपास’ आणि 22 वन्यजीव ‘अंडरपास’ तयार करण्यात येणार आहेत. हा ‘समृद्धी’ महामार्ग बोर व्याघ्र प्रकल्प आणि इतर अनेक पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील भागांमधून जातो. एक्सप्रेस-वेचा एकूण 117 किमीचा पट्टा हा अनेक वन्यजीव अधिवास, व्याघ्र कॉरिडोर आणि तीन अभयारण्यांमधील इको-सेन्सिटिव्ह झोन (एडन) मधून जातो. तानसा, (हरिश्चंद्रगड अभयारण्य), काटेपूर्णा आणि कारंजा सोहोळ यांना ’वन्यजीव-केंद्रित क्षेत्र’ म्हंटले आहे. या ‘एक्सप्रेस-वे’वर आठ वन्यजीव ‘ओव्हरपास आणि 17 वन्यजीव ‘अंडरपास’सह 25 वन्यजीव शमन संरचना असतील. याशिवाय, वन्यजीव-केंद्रित क्षेत्राच्या बाहेरील भागात दोन वन्यजीव ओव्हरपासचीही योजना करण्यात आली आहे.
2015साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे काम 2017मध्ये सुरू करण्यात आले होते. नुकसान भरून काढण्यासाठी आता सुमारे 45 दिवस लागतील आणि जूनच्या अखेरीस ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आता ऑगस्टपर्यंत पहिला आणि दुसरा टप्पा एकत्र सुरू करण्याचा आमचा विचार आहे. याचा अर्थ नागपूर ते शिर्डी हा मार्ग ऑगस्टपर्यंत खुला होईल. असे ’एमएसआरडीसी’च्या अधिकार्यांनी सांगितले. नागपूर ते मुंबई दरम्यानचा संपूर्ण भाग डिसेंबर 2022पर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट होते. पण, ‘कोविड-19’मुळे अनेक विलंबांमुळे, 2023च्या मध्यापर्यंत संपूर्ण रस्ता खुला होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच, नुकतीच वन्यजीव ओव्हरपासची बांधकामाधीन कमान कोसळल्याने एका मजुराचा मृत्यूही झाला आहे. आता प्रकल्प लांबणीवर पडल्यामुळे दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. या महामार्गाचे कामे 2017 मध्ये सुरू करण्यात आले होते. तत्कालीन सरकारच्या काळात हे काम वेगाने सुरू होते.