'हिम्मत असेल तर येऊन दाखवा', शिवसैनिकांची बॅनरबाजी!

23 Apr 2022 12:55:57

Banners
 
 
 
मुंबई : मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत हनुमान चालीसा म्हणण्याचा निर्धार भाजप खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्याकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आला. त्यामुळे शिवसैनिकांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. शनिवारी (दि. २३ एप्रिल)  राणा दांपत्यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांची मातोश्री बाहेर गर्दी जमली असून ठिकठिकाणी; 'हिम्मत असेल तर बांद्रा पूर्व येथे येऊन दाखवा. शिवसैनिक सज्ज आहे.', अशी बॅनरबाजीही करण्यात आली आहे. त्यामुळे हनुमान चालिसेच्या पठणाला मुख्यमंत्र्यांचा एवढा विरोध का? असा प्रश्न सध्या उद्भवत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0