मुंबई: ऐन उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असताना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गुरुवारी राज्यात ‘लोडशेडिंग’बाबत महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, “जिथे वीजबिलांची वसुली कमी झाली आहे तिथे ‘लोडशेडिंग’ला सुरुवात होणार आहे. वीज आणि कोळशाच्या टंचाईमुळे ‘लोडशेडिंग’ला सुरुवात होणार आहे. देशात विजेची टंचाई वाढलेली आहे. नऊ राज्यांमध्ये ‘लोडशेडिंग’ वाढले आहे.
कोळसा मंत्रालयाने रेल्वे मंत्रालयाकडे बोट दाखवले आहे. मात्र, यामध्ये केंद्राची चुकी आहे. ‘अदानी पॉवर’ने काही प्रमाणात वीज कमी केली. खुल्या बाजारात वीज उपलब्ध नाही. त्यामुळे हा ताण वाढला आहे. १५०० मेगावॅट वीज उपलब्ध झाली, तर तत्काळ भारनियमन थांबेल,” असेे ते म्हणाले.