मुंबईत बरसल्या हलक्या पावसाच्या सरी!

21 Apr 2022 14:28:55
Rain
 
 
 
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्याने उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. गुरुवार दि. २१ एप्रिल रोजी सकाळी हलक्या सरी बरसल्या. हवामान खात्याने दिलेल्या अंदाज नुसार, पुढील दोन दिवस हा दिलासा काय राहणार आहे. वातावरण ढगाळ राहणार असून हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वीजांचा कडकडाटही होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या मुंबई शाखेने वर्तवली आहे. कुलाबा वेधशाळेनुसार, गुरुवारचे कमाल तापमान ३२.५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६.५ अंश सेल्सिअस राहील. तर, सांताक्रूझ वेधशाळेनुसार कमाल तापमान ३४.२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६.१ अंश सेल्सिअस राहील.
खासगी हवामान वृत्त संस्था 'स्कायमेट'ने दिलेल्या वृत्तानुसार, २१ एप्रिलच्या सुमारास मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची कुठलाही अंदाज नाही. मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात २२ एप्रिल रोजी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या शहरांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातील काही ठिकाणी याचा परिणाम जाणवू शकतो.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, २२ आणि २३ एप्रिलला विदर्भात कुठल्याही पावसाच्या हालचाली दिसणार नाहीत. मात्र, पण, मराठवाड्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. त्यानंतर, २३ एप्रिलनंतर पाऊस थांबेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0