ऑस्कर सोहळ्यातील 'त्या' घटनेबद्दल परेश रावल म्हणतात...

01 Apr 2022 18:34:24

paresh rawal

 

मुंबई :  ऑस्कर सोहळ्यात अभिनेता विल स्मिथने विनोदी कलाकार ख्रिस रॉकला थोबाडीत लगावल्याच्या प्रकाराबद्दलच्या वादावर अभिनेते परेश रावल यांनी आपले मत व्यक्त करत घडल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस येथे पार पडला. जागतिक स्तरावर सर्वोच्च मल्या जाणर्या या ९४व्या ऑस्कर पुरस्कारसोहळ्याच्या आनंदाच्या क्षणी एक अप्रिय घटना घडली. भर सोहळ्यात विनोद आपल्या पत्नीवर विनोद केलेला सहन न झाल्यामुळे अभिनेता विल स्मिथ याने विनोदी कलाकार ख्रिस रॉक याच्या कानाखाली मारली. 



या घटनेचा सर्व बाजूंनी निषेध झालेला दिसून येतोय. तसेच ऑस्कर चे आयोजन करणाऱ्या ‘द अकादमी’ने या घटनेवर कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे. एका कलाकारच्या अभिव्यक्तीवर लगाम लावण्याचा हा प्रयत्न आहे का, अशी चर्चा सध्या सुरु आहे. या घटनेवर बॉलीवूड अभिनेते परेश रावल यांनी मत मांडत या घटनेचा निषेध केला आहे. अर्थात त्यांनी आपल्या उपरोधिक शैलीत टोला लगावत ट्विट केले आहे, ‘आता कॉमेडियन्सना सुद्धा धोका निर्माण झाला आहे, मग तो ख्रिस असो वा झेलेन्स्की.’




Powered By Sangraha 9.0