कोरोनाने निधन झालेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना नोकरी द्या

06 Mar 2022 18:20:17
                 
teachers
 
 
मुंबई: कोरोना महामारीच्या काळात अनेक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी कित्येक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे कोरोनामुळे निधन झाले.कोरोनामुळे निधन झालेल्या अशा कुटुंबातील किमान एका वारसालाअनुकंपा तत्त्वावर  शासकीय सेवेत सामावून घ्यावे. जेणेकरून त्यांच्या कुटुंबीयांना जगण्याचा आधार मिळेल.
 
शासनाकडून स्थगित असलेली अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया तातडीने सुरू करून कोरोना काळात निधन पावलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या वारसांना तातडीने शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी करणारे निवेदन भाजप शिक्षक आघाडीचे मुंबई अध्यक्ष डॉ. राजू धोंडिबा बंडगर यांनी मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना पाठवले. यावेळी भाजप शिक्षक आघाडी मुंबईचे सोपान मोरे, विरेंद्र नेवरेकर, संदीप खेडकर, उमेश जागडे, महेश खाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0