रुपी बँकेचे सारस्वत बँकेत विलनीकरण

02 Mar 2022 15:24:36

rupee bank
 
 
मुंबई: वित्तीय अनियमिततने रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादलेल्या रुपी बँकेच्या सारस्वत बँकेतील विलनीकरणास रिझर्व्ह बँकेने तत्वतः मंजुरी दिली आहे. गेली नऊ वर्षांपासून ररुपी बँकेवर निर्बंध लागू होते. गेल्या काही वर्षांपासून रुपी बँकेची स्थिती सुधारत आहे. १५ जानेवारी रोजी सारस्वत बँकेतील विलनीकरणाचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेला पाठवला होता, त्याला आता रिझर्व्ह बँकेने मंजुरी दिल्याने या प्रक्रियेस वेग येईल असे मत रुपी बँकेचे प्रशासक सुधीर पंडित यांनी व्यक्त केला आहे.
 
 
दरम्यान रुपी बँकेच्या ६४ हजार खातेधारकांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या ७०० कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यास ठेव विमा महामंडळाने परवानगी दिली आहे. हा विलानीकरणामधला सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. "या ठेवी परत केल्याने रुपी बँकेचे ठेवीदार कमी होणार असल्याने या बद्दल सारस्वत बँक फेरविचार करण्याची शक्यता आहे. तरी या परिस्थितीही सारस्वत बँक विलनीकरणास तयार असेल" असा विश्वास सुधीर पंडित यांनी व्यक्त केला आहे. हे विलनीकरण व्हावे म्हणून केंद्रीय अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेने सहानुभूती दाखवावी आणि रुपी बँकेला मदत करावी अशी विनंती केंद्रीय अर्थमंत्र्यांना करण्यात येणार असल्याचे पंडित यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0