एमआयएम या पक्षाकडून महाविकास आघाडीला युतीसाठी खुली ऑफर

19 Mar 2022 15:35:17

sharad pawar 2


मुंबई :
 ऑल इंडिया मजली-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला आम्ही युती करण्यास तयार आहोत अशी खुली ऑफर दिली आहे. यावरून महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.तसेच विरोधी पक्षांकडून यासंबंधांत महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे.


एमआयएमचे खासदार म्हणतत्व की महाविकास आघाडी हे तीन चाकी सरकार आहे. आमच्याबरोबर युती करा मग हे सरकार चारचाकी होऊन जाईल. या एमआयएमकडून आलेल्या ऑफरवर विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की समविचारी पक्ष एकत्र आल्यास आनंदाची गोष्ट आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हंटले की " औरंगजेबासमोर आम्ही कधी गुडघे टेकणार नाही ". त्यांनी युतीचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. याबाबतीत महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहे.


भाजपचे आमदार नितेश राणे म्हणतात की " वाह.. एमआयएमची महाविकास आघाडी मध्ये येण्याची तयारी..कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे..आता फक्त आयसिसचा प्रस्ताव येणे बाकी आहे..खरंच, करून दाखवलं!!"देवेंद्र फडणवीस म्हणतात की "आम्हाला ठरविण्यासाठी कितीही पक्ष एकत्र येऊदेत आम्हाला फरक पडत नाही !" महाविकास आघाडीतले नेते युतीचा प्रस्ताव स्वीकारतील का ? की धुडकावून लावतील ? याचे उत्तर लवकरच मिळेल.







 

Powered By Sangraha 9.0