जालना : महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात असलेल्या अंबड गावात एका तरुण मुलाची १५ कट्टरपंथी युवकांनी मारहाण करून हत्या केली. १२ मार्चला संध्याकाळी अंबड येथील पठाण टोला येथे घेरून त्याच्यावर लोखंडी रॉड आणि क्रिकेट बॅटने वार करण्यात आले. या घटनेनंतर सर्व आरोपी तिथून फरार झाले. दुसऱ्यादिवशी पिडीत तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर काही हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी ९ जणांना अटक केली तर ६ जन अद्याप फरार आहेत.
मृत तरुणाचे नाव रामेश्वर अंकुश खरात असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचा हिंदू धार्मिक कार्यांशी संबंधित सेवा कार्यात सक्रिय सहभाग होता. त्यामुळेच तो कट्टरपंथिंच्या नजरेत आला. छोट्या घटनेला मुद्दा बनवत त्यांनी रामेश्वरची हत्या केली. असा आरोप करण्यात येत आहे. रामेश्वर खरात हा प्रसाद खरात यांच्यासोबत १२ मार्च रोजी १ च्या सुमारास स्वयंभू महादेव मंदिर रोडवर असलेल्या फुलारे यांच्या विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याची एका तरुणासोबत पोहण्यावरून वाद झाला. त्याला परिसरात पुन्हा दिसलास तर जीवे मारू, अशी धमकी दिली.
तो होळकरनगरमधून संध्याकाळी पाचच्या सुमारास पठाण मोहल्ला मार्गे शेताकडे जात असताना खलील मौलाना यांच्या दुकानासमोर जमावाने अडवले. यादरम्यान त्याला शिवीगाळही करण्यात आली. यादरम्यान शोएब सुलानी आणि शफीक सुलानी यांनी अंकुशवर लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केले. यादरम्यान इतर आरोपींनी त्याच्यावर विविध प्रकारे हल्ला केला. गंभीर जखमी असल्याने तो बेशुद्ध पडला. त्यानंतर काही जणांनी त्याला अंबड येथील सेवा रुग्णालयात घेऊन गेले. तिहून त्याला जालनातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
हत्येची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित लोकांनी पोलीस ठाण्यात जोरदार निदर्शने केली. यानंतर पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी कारवाईचे आश्वासन पाहून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. या हत्येच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, व्यापारी संघटना, धनगर समाज यासह सर्व संघटनांनी १४ मार्च रोजी शांतता मोर्चा काढला. वाढता दबाव पाहता पोलिसांनी या प्रकरणी ९ आरोपींना ताब्यात घेतले, मात्र ६ जण अजूनही फरार आहेत.