औरंगाबाद: जालना जिल्ह्यातील अंबड येथे मुस्लिम धर्मांधांच्या धुंडीने एका २० वर्षीय हिंदू युवकाची हत्या केल्याची घटना १२ मार्च रोजी घडली आहे. विहिरीत पोहण्याच्या शुल्लक वादातून ही हत्या झाल्याचे समोर येते आहे. रामेश्वर खरात असे त्या मृत युवकाचे नाव आहे. गावकऱ्यांच्या जोरदार आंदोलनानंतर घटनेच्या दिवशी रात्री उशिरा पोलिसांनी या घटनेविरोधात गुन्हा दाखल केला. याच घटनेच्या निषेधार्थ अंबड मधील व्यापाऱ्यांनी १४ मार्च रोजी बंद पाळला. याच घटनेविरोधात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. "रामेश्वर हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी केली पाहिजे. तसेच रामेश्वराच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसोबतच योग्य कायदेशीर मदत मिळून न्याय मिळावा अशी व्यवस्था सरकारने करावी" अशी मागणी त्यांनी केली आहे.
घटनेच्या दिवशी दुपारी १ वाजता रामेश्वर हा गावातील फुलारे यांच्या विहिरीवर प्रसाद खरात याच्या सोबत चालला असता त्यांची काही मुस्लिम युवकांसोबत बाचाबाची घडून आली. यावेळेसच त्या मुस्लिम युवकांनी पुन्हा दिसल्यास ठार करू ही धमकी दिली होती. संध्याकाळी रामेश्वर त्याच्या शेताकडे जात असताना गावातील पठाण मोहल्ल्याजवळ मुस्लिम युवकांनी त्याला गाठले. त्यावेळी झालेल्या मारामारीत रामेश्वरवर लोखंडी सळ्यांनी वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये रामेश्वर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.
१५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. इब्राहिम शेख, अदनान सुलानी, शोएब सुलानी यांचा आणि त्यांच्या इतर साथीदारांचा यात समावेश आहे. या घटनेविरोधात स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष असून. बजरंग दल, विहिंप, धनगर समाज यांनी या घटनेचा तीव्र निषेध करून मोर्चा देखील काढला होता.