९३ बॉम्बस्फोट - हुतात्मा आईच्या मुलाचं पत्र : देशद्रोहाविरोधात लढण्यासाठी 'भाजप'चं का?

    11-Mar-2022
Total Views |
       
1993 bombsfot
 
 
मुंबई: १२ मार्च१९९३ साली झालेल्या देशद्रोही हल्ल्यात अनेक जणं शहीद झाले त्यात एक माझी आई होती, देशद्रोला संपवण्याचा आईच्या शवाचा कोळसा पाहून वयाच्या १३ व्या वर्षी निश्चय केला, तेव्हा लहान लवाह काय करावे कळत नव्हते, ती संतापाची आग रगारगात कायम रहावी ह्यासाठी आईच्या शरीराचा ज्या ठिकाणी कोळसा झाला त्या सेंच्यूरी बाजार येथे रात्री जाऊन उर्जा निर्माण करायचो तेव्हा त्या वयात आश्रू देखील गोठले पण देशद्रोहा विरोधातला संताप मात्र रात्र रात्र झोपून देत नव्हता.



शहीदांचे स्मारक होईल असे मा. बाळासाहेब ठाकरे ह्यांनी जाहीर केल्यानंतर २००० साली असलेल्या महापौरांची स्मारक होण्यासाठी भेट घेतली तेव्हा अश्वासन मिळाले पण शेवटी निराशाचं, मगं ठरवलं जर ह्यांच्याकडून शहिदांचे स्मारक घडू शकत नसेल तर देशद्रोह्यांना हे फासावर काय लटवणार ? पहिला आवाज उठला तो देशद्रोही संजय दत्त विरूद्ध , तेव्हा असंख्य संकटांना सामोरे जावे लागले, मिडीयावर देशद्रोहा विरूध्द बोलण्याची संधी निर्माण करून बोलण हे तर अटीतटीचे काम होते. शेवटी त्यात पास झालो आणि माझा देशद्रोहा विरोधातला आवज घुमू लागला, देशद्रोही संजय दत्त ला न्यायालयाने सुनावलेली पुर्ण सजा भोगावी लागण्यासाठी आवज तर अठवलाच एक पत्र तयार करून राज्यपालांना सुपूर्द करण्यासाठी खटाटोट करून राजभवानात पोहचलो पुन्हा निराशा, देशद्रोहा विरूद्ध लढणार्याला अपॉइंटमेंट शिवाय आत घेतले नाही त्याच वेळी देशद्होह्याला समर्थन करण्यासाठी आलेल्या शबाना आझमी ह्यांना मात्र रेड कार्पेट दिले गेले.


संतापाने देशद्रोहा विरूद्ध लढण्यासाठी उमेद वाढली, अनेक राष्ट्रीय - अंतरराष्ट्रीय चॅनल वर मुराखती झाल्या शेवटी देशद्रोही संजय दत्तलापुर्ण सजा भोगावी लागली ( माझ्या लेखी ह्या देशद्रोह्याला ज्याला खासदाराचा मुलगा म्हणून इतोसंट बॉय असं उच्चारलं होतं त्याला देखील देखील फाशीच व्हायला वही होती ). देशद्रोही याकूब मेमन जो तुरूगात आजन्म कैदेत राहून देखील बिर्याणी खात होता, नातेवाईकांशी छान गप्पा मारत होता त्याला फाशी मिळू नये ह्यासाठी समाजातील सो कॉल्ड प्रतिष्ठीत व्यक्तिंनी पुढाकार घेऊन राष्ट्रपतीं कडे त्याला सोडवण्यासाठी धाव घेतली त्योपर्यंत त्याच्या विरोधात मी फक्त मिडावर बोलत होतो पण ह्या कृत्यानंतर देशद्रोहा विरुद्द देशातल्या जनतेच्या सह्या घेऊन त्या ज्यांनी मला सहकार्य केले अश्या मिनल मोहाडीकर ह्यांच्या बरोबर राज्यपालांना सुपूर्द केल्या तेव्हा जाणले कोणतीही अपॉइंटमेंट नसताना भेट देणारे राज्यपाल मा. श्री. विद्यासागर राव हे सामान्य जनतेचे आहेत. त्यानंतर श्रेयांस कानविंदे ह्या मित्रा मुळे भेट झाली ती  सुनीलजी देवधर ह्यांची त्यांनी मला देशद्रोहा विरूद्ध लढण्याची आणखी उभारी दिली त्यानंतर देशद्रोहा विरूद्ध विधानभवनात आवज उठवण्यासाठी आमदार. आशिष शेलार ह्यांची भेट घेतली व त्यांनी सही करुन माला विधानभवनात नेऊन केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी, महाराष्ट राज्य मुख्यमंत्री. मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस ह्यांची व अनेक आमदारांची भेट घडवू.


दिली, एक सह्यांचे पत्र गडकरीजींना पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजींसाठी सुपूर्द केले तेव्हा ते म्हणाले देशद्रोहा विरुद्द कारवाई होणारचं.. तेव्हा जिवात जीव आला पण देशद्रोह्यांकडून माझा जिव घेण्याचा कट सुरू झाला होता हे आमदार आशिष शेलार ह्यांना कळताचं त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून पोलिस आयुक्त श्री. राकेश मारीया ह्यांना सांगून मला संरक्षण दिले. पहाटे आनंदाने खासदार मा. श्री. किरीट सोमय्या ह्यांचा अभिनंदधासाठी फोन आला "देशद्रोही याकूबला फाशी जाहीर झाली " सांगण्यासाठी... आजही लढतोय लढत रहाणार ह्या देशद्रोहा विरूद्ध देशासाठी आपल्या मातृभूमिसाठी.. देशप्रेमी भाजपा आहेच सथीला म्हणूच तर मनगटात आलाय जोर देशद्रोह्यां विरूद्ध लढणाचा. आपल्या देशप्रेमींची साथ सदैव देशद्रोहा विरूद्ध लढताना कायम लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद 


- शेफ. तुषार प्रीती देशमुख

१९९३ बॉम्बस्फोटातील शहीद आईचा मुलगा