राष्ट्रविरोधी मजकूर पसरवणाऱ्या 'फहद शाह' ला अटक

05 Feb 2022 15:34:05
 
 
                                       
fahad shah 
श्रीनगर: काश्मीर श्रीनगर येथील ऑनलाईन न्यूज पोर्टल ' द काश्मीर' चा संपादक 'फहद शाह याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. राष्ट्रविरोधी आणि कायदा सुव्यस्थेला बाधा आणणाऱ्या भडकाऊ बातम्या पसरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सोशल मीडियावरून लोकांच्या मनात घाबरत उत्पन्न करून त्यांना सरकारविरोधात भडकवण्याचे काम काही पोस्ट्स च्या माध्यमांतून होत होते. याच प्रकारच्या चौकशीसाठी फहद याला त्याच्या सामग्रीसह पुलवामा पोलीस ठाण्यात बोलावले गेले होते. याच चौकशी दरम्यान त्याला अटक करण्यात आली.
 
'द काश्मीर' हे ऑनलाईन न्यूज पोर्टल २०११ मध्ये सुरु करण्यात आले होते. जम्मू- काश्मीर मधील सामाजिक, सांस्कृतिक बातम्या दिल्या जातील असा दावा या पोर्टलने केला आहे. याच पोर्टल वरून फहदने कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध केला होता. इथे वार्ताहर म्हणून काम करणाऱ्या सज्जाद गुल याने सातत्याने मोदी सरकार विरोधात द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट शेअर केल्या होत्या, याच गोष्टीसाठी पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केली होती.
 
दरम्यान या अटकेवर प्रतिक्रिया देताना जम्मू -काश्मीर मधील नेत्या आणि पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती त्यांनी सरकारची निंदा केली आहे. "सत्याचा पुरस्कार करणे आता गुन्हा ठरायला लागला आहे. सरकारला सत्याचा आरसा दाखवणे राष्ट्रविरोधी ठरायला लागले आहे" अश्या शब्दांत मुफ्ती यांनी सरकारवर टीका केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0