होमग्राऊंडवरच एकनाथ शिंदेंना दणका? : ३०० शिवसैनिक भाजपात

20 Feb 2022 18:46:15

Thane BJP
 
 
ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने `होम ग्राऊंड'वरच जोरदार दणका दिला आहे. रविवार दि. २० फेब्रुवारी रोजी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात ३०० शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात काही शाखाप्रमुखांचाही समावेश आहे. यावेळी भाजपचे आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर उपस्थित होते.
 
 
 
शिवसेनेकडून प्राथमिक आश्वासनेही पूर्ण झालेली नाहीत!
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपकडून देशाचा विकास होत आहे. मात्र शिवसेनेकडून नागरिकांना दिलेली प्राथमिक आश्वासनेही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे आता भाजपचे कार्य करणार आहोत.", असे शिवसेनेचे शाखाप्रमुख समीर नार्वेकर यांनी सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0