कांदिवली : सह्याद्रीनगरात पालिका निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याची तयारी?

10 Feb 2022 14:45:15


sahyadri 
 
 
कांदिवली पश्चिममधील चारकोप विभागातील सह्याद्रीनगर येथील नागरिक विकास रखडल्याने येथील रहिवासी संतप्त झाले आहेत. मुंबई पालिकेकडून नागरी विकास कामांकडे दुर्लक्ष होत असल्याने जर जर यामध्ये बदल नाही झाला तर पालिका निवडणुकांवर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा तेथील नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून देण्यात येत आहे.
 
 
सुमारे २७ एकरमध्ये पसरलेल्या चारकोपमधील सह्याद्रीनगरच्या भूभागावर ३२ इमारती असून सुमारे २००० पेक्षा जास्त घरे येथे आहे. येथील लोकसंख्याही सुमारे दहा हजारापर्यंत आहे. परंतु येथे उघड्या गटारांसह अनेक समस्यांना नागरिकांना द्यावे लागत आहे. याबाबत पालिकेकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आलेला असतानाही अजूनपर्यंत याची दखल घेण्यात आली नसल्याची तक्रार येथिक नागरिकांनी केली आहे.
 
सह्याद्रीनगरमधील इमारत क्रमांक २ येथील गटार उघडे असल्याने तेथील मछरींचे प्रमाण वाढत असल्यामुळे या परिसरात रोगराई पसरण्याची भीती वाढू लागली आहे. याशिवाय या भागातील अनेक गटारांवर झाकणे देखील बसवण्यात आलेली नाहीत. तसेच या विभागातील नागरी सुविधांवर कमी खर्च होत असल्याने भविष्यात यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणीही सध्या जोर धरत आहे.
 
सह्याद्रीनगरचा भूभाग हा खाजगी भूभाग असल्यामुळे तेथे नागरी सुविधा पुरविल्या जात नसल्याचे उत्तर पालिकेच्या अधिकार्यांकडून देण्यात येत आहे. परंतु येथील घरांकडून पालिकेस मालमत्ता व पाणीपट्टी कार्टून लाखो मिळतात आणि या गोष्टीकडे 'नागरिकायन ' या सामाजिक संस्थेचे विश्वस्त घनश्याम देटके यांनी लक्ष वेधले आहे. या भागातील नागरिक हे नागरी सुविधांपासून वंचित राहत असल्यामुळे बहिष्कार इशाऱ्याचे पत्र पालिकेस देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0