इंग्लंडच्या राजघराण्यातील महिलांच्या नशिबी केवळ दु:ख आणि वेदना

07 Dec 2022 17:19:01

प्रिन्स हॅरी
 
 
 
 
लंडन : इंग्लंडच्या राजघराण्यापासून विभक्त झालेले प्रिन्स हॅरी यांनी उज्ज्वल परंपरा आणि इतिहास असलेल्या राजघराण्यातील महिलांच्या नशिबी केवळ दु:ख आणि वेदना असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हॅरी यांनी ‘व्हायरल’ केलेल्या या व्हिडिओला जगभरातील चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.
 
 
 
हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन मर्केल यांच्या जीवनावर आधारित ‘हॅरी अ‍ॅण्ड मेघन’ ही लघुपटाची मालिका ‘नेटफ्लिक्स’वर येत आहे. त्यानिमित्त सोमवारी ‘व्हायरल’ झालेल्या टीझरमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. इंग्लंडच्या राजघराण्यात परंपरा आहेत, मात्र त्यात मोठ्या प्रमाणात गळतीदेखील आहे. त्यात काही घटना घडतात तर काही घडवून आणले जाते अशी व्यथाही प्रिंस हॅरी यांनी मांडली आहे. राजघराण्यात असतानाच भूतकाळ किती कठीण होता, याची आठवण होताच हॅरी गहिवरुन गेल्याचे त्यांनी या टिझरमध्ये म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0