महापरिनिर्वाणदिनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे महामानवास अभिवादन !

06 Dec 2022 17:10:58
PRSHANT THAKUR


मुंबई :
भारतीय संविधानाचे शिल्पकार, परमपूज्य, बोधिसत्व,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्रतेने अभिवादन केले.
त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की ,"बाबासाहेबांचे जीवनचरित्र मानवी स्वातंत्र्याच्या इतिहासाचे सोनेरी पान आहे. त्यांनी समाजाला समता, बंधुतेचा मार्ग दाखवला. ही मूल्ये अंगिकारण्यासाठी आग्रही राहूया." तसेच या अभिवादन सभेस पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बिनेदार, नरेंद्र गायकवाड यांच्यासह अनेक भीम अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.


Powered By Sangraha 9.0