छ. संभाजी राजे स्वराज्यरक्षक प्रमाणे धर्मवीर देखील होते; फडणवीसांनी अजितदादांना सुनावले!

    31-Dec-2022
Total Views |
ajit-pawar and fadnavis



बीड
: छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाही तर स्वराज्यरक्षक होते, असे वक्तव्य हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ३० डिंसेबर रोजी खासदार अजित पवार यांनी केले होते. या अजित पवारांच्या वक्तव्याचा फडणवीसांकडून समाचार घेण्यात आला असून छत्रपती संभाजी महाराज ह्यांनी राष्ट्रधर्म,स्वधर्म आणि हिंदू धर्म यांचे रक्षण केले. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते.असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.३१ डिंसेबर रोजी बीडमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीच्या समारोप प्रसंगी पत्रकारांशी बोलताना केले आहे.



'छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केलं राष्ट्रधर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म तिन्हीच रक्षण त्यांनी केलं धर्मांतरण करा हे त्यांनी कधीच मान्य केलं नाही. धर्मांतर न करता हालअपेष्टा सोसत बलिदान दिले ते धर्मवीरच होते. त्यामुळे छ. संभाजी राजे स्वराज्यरक्षक प्रमाणे धर्मवीर देखील होते' असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टोला लगावला.