शिर्डी : खासदार भरत गोगावले हे नववर्षानिमित्त दि. डिंसेबर रोजी शिर्डीत साईबाबाच्या दर्शनासाठी गेले आहेत. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार अजित पवारांच्या ' छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाही तर स्वराज्यरक्षक होते' या वक्तव्याचा गोगावलेनी चांगलाच समाचार घेत 'छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरचं' असे प्रत्युत्तऱ दिले आहे.
गोगावले म्हणाले, " 'धर्मवीर' ही पदवी छत्रपती संभाजी महाराजांना आता मिळाली नसून फार पुर्वीपासून त्यांना धर्मवीर म्हणटले जाते. मुळात छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी जे बलिदान दिले त्यामुळे त्यांना धर्मवीर ही पदवी मिळाली. औरंगजेबाकडून आतोनात छळ होऊन सुध्दा छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मातंर केले नाही त्यामुळेच ते धर्मवीर आहेत, असे भरत गोगावले म्हणाले.