शिवसेना राष्ट्रवादीची झाली म्हणून बाहेर पडलो : एकनाथ शिंदे

"राष्ट्रवादीची शिवसेना" असं म्हणणाऱ्या जयंत पाटील आणि भास्कर जाधवांना सुनावले

    30-Dec-2022
Total Views |

Eknath Shinde


नागपूर : नागपुर विधान भवनाच्या परिसरात विरोधी पक्षाची भुमिका मांडण्यासाठी खासदार अजित पवार उभे असताना जयंत पाटील आणि भास्कर जाधव एकमेंकाशी बोलताना पाटील यांनी राष्ट्रवादीची शिवसेना असा उल्लेख केला. त्यावर भास्कर जाधव यांनी ही हसत 'राष्ट्रवादीची शिवसेना' या बोलण्याला होकार दर्शवलास होता. याच वक्तव्याचा समाचार घेत शिवसेना राष्ट्रवादीची झाली म्हणूनच आम्ही बाहेर पडलो, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नागपुर हिवाळी अधिवेशनात दि.३० डिंसेबरला अडीज वर्षात विर्दभासाठी तुम्ही कोणता निर्णय घेतला? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार अजित पवार यांना विधान परिषदेत विचारला. तुम्ही कितीही टीका केली तरी मराठवाडा, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सर्वांचा समतोल विकास करण्याचा प्रयत्न आम्ही महाविकासने केला, असा दावा खासदार अजित पवार यांनी २७ डिंसेबर रोजी विधान परिषदेच्या भाषणात केला होता. त्यावरून अडीज वर्षात विर्दभासाठी कोणता निर्णय घेतला? असा सवाल करत ३० डिंसेबरला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदेनी अजित पवारांचा खरपुस समाचार घेतला आहे.

विदर्भातील शेतकरी चांगल्या गाडीतुन फिरला पाहजे. विमानातून शेतकरी फिरला पाहिजे. तालुक्यात विमानतळ सुरु करतोय. मुख्यमंत्री कसा हेलिकॉप्टरने शेतावर जातो म्हणुन हिणवलं. दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाणारा दाखवा आणि बक्षिस मिळवा असं म्हटले. मी तर म्हणतो मागचे मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडले हे दाखवा आणि बक्षिस मिळवा. मी पंतप्रधान यांच्याशी बोललो ते म्हणाले की असे उद्योग जात नसतात. त्यांना काय माहीत की सरकार बदलणार आहे. बाकीचे इंटरेस्ट ठेवलं तर कोण येणार इथे? ७० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले. त्यापैकी ४० हजार कोटींचे प्रकल्प विदर्भात आहेत.

जलयुक्त शिवार योजना जी महाविकास आघाडीच्या काळात बंद झाली होती. ती योजना फडणवीस- शिंदे सरकारने पुन्हा सुरू केली.असे ही शिंदे म्हणाले. नागपूर रेल्वे प्रकल्प टप्पा -१ ला ९ हजार २७९ कोटीच्या सुधारित खर्चास मान्यता, वडसा देसाईगंज नवीन रेल्वे मार्गासाठी ९ हजार ९६ कोटी सुधारित खर्चास मान्यता, विदर्भासाठी एकूण ४४ हजार १२३ कोटी रूपयांची गुंतवणूक,तसेच ४५ हजार रोजगार निर्मिती होणार, गडचिरोलीत २० हजार गुंतवणूकीच्या खनिज उत्खनन प्रकल्पास मान्यता, गोसीखुर्द येथे १०० एकर जागेवर जागतिक जल पर्यटन प्रकल्प उभारणार असल्याचे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.






आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.