‘ते’ मलाही सोडणार नाहीत! सुशांतच्या हत्याप्रकरणात विवेक अग्निहोत्रींच्या ट्विटने खळबळ

29 Dec 2022 12:44:14

विवेक अग्निहोत्रीं

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे प्रकरण अडीच वर्षांनी पुन्हा बाहेर आले असून त्या संदर्भात दररोज नवनवीन माहिती येत आहे. चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटने दिवस गाजला.
अग्निहोत्री यांनी सुशांतच्या शवविच्छेदनाच्या वादावर प्रतिक्रिया देण्यासाठी पोस्ट केली आहे. सुशांतसोबत एक फोटो ’शेअर’ करत त्यानी लिहिले: ’ते मलाही सोडणार नाहीत...’ ’ते’ कोण होते, सुशांत, माझा मित्र? त्यांच्या या ट्विटवर सुशांतचे चाहते कमेंट्स करत सुशांतला न्याय द्यावा, अशी मागणी करत आहेत.

‘तत्कालीन सरकारवर विश्वास नसल्यानेच अडीच वर्षे गप्प’

सुशांतसिंहने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच झाल्याचा दावा कूपर रुग्णालयाच्या शवागारातील रुपकुमार शाह यांनी केला आहे. अडीच वर्षांपूर्वी असलेल्या तत्कालीन सरकारवर विश्वास नसल्याने आपण एवढे दिवस गप्प बसल्याचे त्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले.

Powered By Sangraha 9.0