ठाणे खाडीला मिळाले ‘रामसरचे प्रमाणपत्र’

27 Dec 2022 18:48:44

Ramsar





मुंबई (विशेष प्रतिनिधी): ऑगस्ट महिन्यात ठाणे खाडीला रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळाला होता. त्याप्रमाणे मंगळवार, दि. २७ डिसेंबर रोजी ठाणे खाडीला 'रामसर पाणथळ स्थळाचे प्रमाणपत्र' प्राप्त झाले आहे. ठाणे खाडीसह देशातील इतर २८ नवीन स्थळांचा ‘रामसरमध्ये समावेश करण्यात आला आहे. या स्थळांना यामुळे आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे.




१९८२ पासून भारतातील पाणथळ स्थळांचा 'रामसर'च्या यादीत समावेश होऊ लागला. १९८२ ते २०१३ या कालावधीत २६ स्थळांचा 'रामसर'मध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर ४९ नवीन पाणथळ स्थळांचा २०१४-२०२२ या कालावधीत समावेश झाला. आणि यंदा २०२२ साली २८ स्थळांना रामसरमध्ये अंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त करून दिले आहे.


आता भारतात एकूण ७५ रामसर पाणथळ क्षेत्र! 


ठाणे खाडी परिसर एकूण ६५२२.५ हेक्टर (हेक्टर) क्षेत्रफळात विस्तारित आहे, त्यापैकी १६९०.५ हेक्टर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि अभयारण्याभोवती इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून अधिसूचित ४,८३२ हेक्टर करण्यात आले होते. आता रामसर साइट म्हणून घोषित केलेले सर्वात मोठे पाणथळ क्षेत्र आहे. आता भारतातील एकूण ७५ स्थळांचा रामसरमध्ये समावेश झाल्यामुळे १३,२६,६७८ हेक्टर इतके क्षेत्र झाले आहे.



१९८२ पासून २०२२ पर्यंत एकूण ७५ रामसर पाणथळ स्थळांचा समावेश या यादीत आहे. एकूण २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ७५ पाणथळ स्थळांचा यात समावेश आहे. रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी देश विदेशातून पर्यटक आकर्षित होतील. तसेच पर्यावरण व पर्यटन वाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. यासोबत पाणथळ जागेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचून त्याच्या संरक्षणास आणि संवर्धनास अधिक गती मिळतांना जागतिक पर्यटन नकाशावरदेखील याची नोंद होईल, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे.




Powered By Sangraha 9.0