दिशाचा मुद्दा पुन्हा का आला? राऊत संतापले ...

22 Dec 2022 17:41:20
 
sanjay raut
 
 
 
 
मुंबई : सुशांत सिंग राजपुत मृत्यूचा तपास सीबीआय, महाराष्ट्र पोलिसांनी केला आहे. सीबीआय ने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुशांत सिंह ने आत्महत्या केली असा अहवाल दिला आहे. राहुल शेवाळे यांनी काही कारण नसताना एक मुद्दा उपस्थित केला, कारण नसताना ते घसरले. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी झाली. विधानसभेत देखील विषय हा चर्चिला गेला, राहुल शेवाळे यांना हे बोलण्याचा अधिकार आहे का? असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद म्हणाले.
 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचार केला असून त्याच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली असती म्हणून आज दिवसभर दोन्ही सभागृहात गोंधळ घालण्यात आल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. हे प्रकरण एनआयटी भूखंड घोटाळ्यामुळे काढण्यात आला आहे, रेवड्या वाटतात त्या प्रमाणे भूखंड वाटले. यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी हे प्रकरण काढण्यात आला. 16 भूखंड घोटाळ्याचं प्रकरण मोठं आहे. राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव, यामिनी जाधव यांच्या फाइल का बंद झाल्या ? तुमच्या फाइल उघडायला लावू नका, तुमच्या फाइल सेंट्रल हॉल पर्यंत जाणार. आमच्या भ्रष्टाचारावर बोलणारे किरिट सोमय्या कुठं गेले आहेत?" असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0