जालना : मनाविरुद्ध लग्न केले म्हणून जालना तालुक्यातील पीर पिंपळगावात बुधवार, दि.१४ डिसेंबर रोजी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अर्धा एकर जमीन मुलीच्या नावावर केली नाही म्हणून मुलीचा काका-वडीलांमध्ये वाद झाला. त्यातून संतापलेल्या वडील व काकांनी मुलीच्या गळ्याला दोर बांधून घराजवळच्या लिंबाच्या झाडावर लटकवले. तसेच दोघांनीच सरण रचून तिचा मृतदेह जाळला.
गावातील मंदिरात मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती. त्यावेळी मुलीच्या काकांनी अर्धा एकर जमीन मुलीच्या नावे करण्याची मागणी केली. परंतु जमीन नावावर करण्यास नकार मिळाल्याने काका आणि वडिलांनी स्वतःची बदनामी झाली म्हणून मुलीला मंडपातून ओढत घरी आणले. मुलीच्या गळ्याला दोर बांधून घराजवळच्या लिंबाच्या झाडावर लटकवले. दोघांनीच सरण रचून तिचा मृतदेह जाळला. राख दोन पोत्यात भरून ठेवली.
सूर्यकाला संतोष सरोदे असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. तर संतोष भाऊराव सरोदे आणि नामदेव भाऊराव सरोदे, अशी संशयित आरोपीची नावे आहेत. सूर्यकाला ही संतोष सरोदे यांची तिसरी मुलगी होती. चुलत आत्याच्या मुलांचे आणि सूर्यकाला हिचे प्रेम जुळले. दोघे ही घरातून पळून गेले होते. माञ घरच्यांनी त्यांना लग्न करून देतो, असे सागून पुन्हा घरी बोलावले.
मंगळवार दि.१३ डिसेंबर रोजी दोघाचे लग्न करण्याचे ठरवले. माञ, काकांनी अर्धा एकर जमीन मुलीच्या नावे करण्याची मागणी करण्याच्या रागातून वडील व काकांनी तिला ओढत घरी आणले. आणि गळ्याला दोर बांधून घराजवळच्या लिंबाच्या झाडावर लटकवले. ऑनर किलिंगची ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे.
"मनाविरुद्ध लग्न केल्याने मुलीची वडिलांनी हत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. यात आरोपी वडिल आणि काकांना अटक झाली आहे. या घटनेत पोलिस तपासानंतर आरोपींना कठोर शिक्षा होईल मात्र समाज म्हणून आपण अजून मागासलेले आहोत याचीच ही प्रचिती आहे. समाजातील प्रतिष्ठा, मुलीने परस्पर घेतलेला निर्णय या रागाच्या भरात पोटच्या मुलीची हत्या वडिलांनी केली आहे. आई वडिल आणि मुलांमध्ये संवाद झाला पाहिजे. मुलांना समजून घेतल पाहिजे. मुलांचे निर्णय चुकू शकतात पण संवादातून मार्ग निघू शकतो. यादृष्टीनेही काम करावे लागणार आहे.", अशी प्रतिक्रीया राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.