अंधारेंच्या प्रतिमेला वारकऱ्यांनी हाणले जोडे!

15 Dec 2022 18:37:37
सुषमा अंधारे


ठाणे:
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संतांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. ठाण्यात वारकरी संप्रदायाच्यावतीने सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला.यावेळी वारकऱ्यांनी नतद्रष्ट सुषमाताई अंधारे असा उल्लेख करीत घोषणाबाजीही केली. यापुढे अशीच वक्तव्ये सुरु राहिली तर राज्यभरात आंदोलन तीव्र केले जाईल. असा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्राला थोर संतांचा वारसा लाभला आहे. संतांचे उपदेश तर जगभर प्रसिद्ध असून पंजाब येथील गुरु ग्रंथसाहिब यांच्या ग्रंथात देखील संत नामदेव महाराजांचे नाव आहे.संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या लहानवयात चमत्कार केले, दिव्य चमत्कार करणारे ते जादूटोणा करणारे बाबा नव्हते. तर त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. संत तुकोबाची गाथा व अभांगाच्या माध्यमातून कीर्तन प्रवचने होतच असतात.तरीही संस्कृतीचा विसर पडलेल्या सुषमा अंधारे हिंदु धर्मावर टिका करीत असुन याविरोधात गुरुवारी वारकऱ्यांनी एकजुट दाखवत अंधारे यांचा निषेध केला. दरम्यान, संतावरील अशी आक्षेपाई वक्तव्यं थांबली नाहीत तर महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वारकरी विलास फापाळे यांनी दिला आहे.संतांवरील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शिस्तप्रिय आणि शांत असलेला वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात आक्रमक झालेला पाहायला मिळत असून अंधारे यांनी माफी मागावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.




Powered By Sangraha 9.0