केरळ स्टोरीला माकप खासदारांचा विरोध; अमित शहांकडे पाठवले दोन पानी पत्र
09-Nov-2022
Total Views |
केरळ : द केरळ स्टोरी चित्रपटाचा वाद वाढत चालला आहे. सत्य घटनेचा पर्दाफाश करणाऱ्या चित्रपटांवर वाद उत्पन्न होणं साहजिक आहे. चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतरच अनेकांच्या तीव्र प्रतिक्रिया याबाबतीत समाज माध्यमांवर उमटल्या होत्या. आज माकप राज्यसभेचे खासदार जॉन ब्रिटास यांनी या टीझरबद्दल निषेध व्यक्त केला आहे. व त्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हे पात्र दोन पानांचे आहे. हे दोन पाणी पत्र जॉन ब्रिटास यांनी गृहमंत्री अमित शाह याना पाठवले आहे. या पत्रात त्यांनी सोशल मीडियावरवर व्हायरल होत असलेला चित्रपट 'द केरला स्टोरी'च्या टिझरविरुद्ध कारवाई करण्याचा आग्रह केला आहे. पत्रात लिहिले आहे की, ते खोटी माहिती पसरवत आहेत, जी सार्वजनिक शांतता भंग करू शकते आणि यातून केरळची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे लिहिले आहे.
तसंच 'द केरला स्टोरी'चा टीझर समोर येताच निर्मात्यांवर चित्रपटाच्या माध्यमातून केरळला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. आता 'द केरळ स्टोरी'च्या टीझरवर एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, आता केरळच्या डीजीपींनी तिरुवनंतपुरमच्या पोलीस आयुक्तांना 'द केरला स्टोरी'च्या टिझरवर एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
"मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या तक्रारीनंतर एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हायटेक क्राइम इन्क्वायरी सेलने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली आणि त्याचा अहवाल डीजीपींकडे पाठवला." असे केरळ पोलिसांनी सांगितले.
'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर तामिळनाडूतील एका पत्रकाराने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना पत्र लिहिले. पत्रकाराने केरळ सरकारला चित्रपटाच्या दिग्दर्शकाला बोलावून टिझरच्या सत्यतेची चौकशी करण्याची विनंती केली होती, ज्यात दावा केला होता की, केरळमधील 32,000 मुलींचे बळजबरीने धर्मांतर करण्यात आले, ज्या नंतर दहशतवादी गट ISIS मध्ये सामील झाल्या.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.